|
पु. राजा ; अधिराज ; बादशहा ( मराठींत क्वचित् उपयोग ) म्ह० नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन . [ फा . शाह ] पु. ( साव . ) १ सावकार ; शेट . २ सावकाराची पदवी ; पत असलेली असामी ; पैशाची देवघेव करण्यांत अगदीं विश्वासाचें कूळ . म्ह० शहा किंवा पादशहा . ३ जकातदार ; कर वसुली करणारा अधिकारी . शहाचा दाखला , किंवा शहाची टीप , जकातदाराकडे भरणा केल्याची पावती . [ साव . ] उद्गा . कान्होबाचें वगैरे वारें अंगांत शिरल्यावर झाडाच्या तोंडांतून निघणारा उद्गारवाचक शब्द . - पु . साक्षात्कार . - सोहि महदनु . [ घ्व . ] वि. कृष्ण ; काळें . [ फा . सियाह् ] ०जंग पु. युध्दसम्राट ; एक पदवी . [ फा . ] ०काळे काळें कुट्ट . ०जोग वि. १ नांव लौकिकाचा ; पतीचा ; विश्वासूक ( धंदा किंवा माणूस ); भरंवशाचा . २ एक जातीची हुंडी ; ही हुंडी दाखविणारास हुंडीतील रुपये ( सदरहू इसम पतदार आहे असें समजून ) मिळतात ; ( दर्शनी हुंडीप्रमाणें ). ३ बिन दिक्कत द्यावयाचें ( रुपये , इ० ); बिनभानगडीची ( गोष्ट ). तुमचें शहाजोग रुपये देणें , त्याचा कोण तंटा सांगेल . ४ अगदीं खरें , बरोबर चालणारें ( नाणें ). [ हिं . ०जादकी स्त्री. यौवराज्य ; राजपुत्रपणा . ज्या दिवशीं पातशहास शहाजादकी तुटून पातशाही जाली . - ऐठि ५१ . [ फा . ] शाह्झादगी . ] ०जादा पु. राजपुत्र ; युवराज . [ फा० शाह्झादा ] ०जादी स्त्री. राजकन्या . चांदबीची नामें शहाजादी हिनें कमर्बन्दीकरून दिलीचे फौजेसी लडाई बारा वर्षे केली . - इस १ चांदबिबी १० . [ शाह्झादी ] ०जानी दानी - शहाजहान बादशहाचा , संबंधाचा , वेळचा ( रुपया , राज्य इ० ) ०जोर मोठी सत्ता , सामर्थ्य . - वि . सुरेख ; भव्य ; बादशाही ; उत्कृष्ट ; प्रबळ . - क्रिवि . सुरेखपणानें ; भव्य रीतीनें ; राजशाही पध्दतीनें . [ फा . ] ०न पु. राजधिराज ; अधिराज . तुम्हास किताब मोठा शहानशहा पादशहा जहाला असता . - मदरु १ . १११ . [ फा . शहन्शह . शहा पु. राजधिराज ; अधिराज . तुम्हास किताब मोठा शहानशहा पादशहा जहाला असता . - मदरु १ . १११ . [ फा . शहन्शह . ०नामा पु. फिर्दोसीनें फारसींत लिहिलेला काव्यमय इतिहास . [ फा . शाह्नामा
|