Dictionaries | References व वरहि वरायास पाहिजे समज। Script: Devanagari Meaning Related Words वरहि वरायास पाहिजे समज। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वर मागण्यासहि अक्कल लागते. " पार्थ म्हणें, ‘ गोविंदा, न्यस्तायुध तूंचि पाहिजेस मज ’। मागे सैन्य सुयोधनवरहि वरायास पाहिजे समज॥" -मोरोपंत. याबद्दल हरिदास अनेक गोष्टी सांगतात. एका मनुष्यास देवी प्रसन्न झाली व त्यास तीन वर दिले. एका वरानें त्यानें आपली कुरुप स्त्री सुंदर व्हावी म्हणून मागितलें, तेव्हां त्याची स्त्री सुंदर बनली. ही गोष्ट राज्याच्या कानीं जाऊन त्यानें त्या स्त्रीस आणावयास मेणा पाठविला. मेण्यांतून त्या स्त्रीस नेत असतां यानें तिला आस्वलीचें रुप प्राप्त व्हावे असें दुसर्या वरानें मागितलें. राजानें मेणा उघडून पाहातांच आस्वलास पाहून तीस परत घेऊन जाण्यास सांगितलें. तेव्हा त्यानें पुन्हां आपली बायको पहिल्या सारखी ( कुरुप ) व्हावी अशी प्रार्थना करुन तिन्ही वर फुकट घालविले. याच्या उलट एका अंधळयानें, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलें मला पाहूं दे, असा एकच वर मागितला. पण यामुळें स्वतःला दृष्टि, संतति व राज्यपद अशा तीन गोष्टी मिळविल्या. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP