Dictionaries | References

लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें

   
Script: Devanagari

लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें     

प्रत्येक प्राणी हा आपल्या स्वभाव धर्माप्रमाणेंच वागणार. फक्त जोपर्यंत बंधनाची मर्यादा असतें तोंपर्यंत तो फार तर तेवढें बंधन पाळतो, एकदां बंधन सुटलें, कीं तो त्या मर्यादेबाहेर आपल्या स्वभावधर्मानुसार गेल्याशिवाय राहात नाहीं. उकरिडयावर लोळणें हाच गाढवाचा स्वभावधर्म. तें जोंपर्यंत बांधलेलें असतें तोपर्यंत नाइलाज म्हणून वा अशक्यता म्हणून तें तेथेंच असतें, पण सोडलें, कीं प्रथम उकीरडयावरच जायचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP