|
न. भिकार्यांचा थवा , समुदाय ; समुच्चयानें भिकारी लोक . - वि . दरिद्री ; भिकारी ; कंगाल ; जीवनाच्या सामान्य सुखाविरहित ( देश , गांव , खेडें ); भिकारी ; दरिद्री . जसें - भिकारी - राज्य - जमीन - बाग - दौलत - पीक - हंगाम इ० [ सं . भिक्ष = मागणें ] ०काम न. दरिद्री , भिकारी काम . ०खाना पु. भिकार्यांची वस्तीची जागा . भिकार घर , वसतिस्थान . ( निंदेनें ) भिकारी , दरिद्री मानलेलें घर . ०खोड चट चाळा - स्त्रीपु . अशिष्ट , बिनसंभावित , भिकार्यासारखी खोड , चाळा , चाल , रीत , ढंग , संबंध . ०गंड न. भिकारी लोक . ०चेष्टा स्त्री. हलकट , क्षुद्र , घाणेरडें , गदळ , अयोग्य काम , कृत्य ; निवळ रिकामा कारभार ; बेफायदेशीर कृत्य . ०चोंट वि. ( निंदार्थी ) भिकारी ; कृपण . दरिद्री ; तुच्छ ; पसंत नसलेला ; ( किंमत , बळकटी , पुष्ठता , इ०कांत ) कमी दर्जाचा ; अपुरता ( पदार्थ ). ०छंद पु. वाईट नाद , संवय , खोड . ०टोकार न. ( व्यापक , सामा . ) भिकारी लोक ; भिकार्यांचा व टोळभैरवांचा समुदाय . [ भिकार द्वि . ] ०डा पु. ( तिरस्कारदर्शक ) भिकारी . ०णें अक्रि . भिकारी , दरिद्री होणें . ०दासावर - स्त्री . अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी , विनंति . हुंडी - स्त्री . अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी , विनंति . ०पेठ स्त्री. मालाचा पुरवठा पूर्ण नसलेलें शहर . ( समासांत ) भिकार - नगरी - पुरी - वस्ती इ ००बुद्धि स्त्री. भिकारी - बुद्धि ; हलकी कल्पना , युक्ति , तोड , सल्ला , विचार . ०भास स्त्री. ( गो . ) भिकार चेष्टा . ०भोपळा वि. दुर्दैवी ; कपाळकरंटा . ०लक्षण न. हलकट व भिकारी लक्षण , चिन्ह ; भिकार चाळा . ०लाड पु. ( भिकारी करण्यासारखे लाड ) अतिशय कौतुक आणि लालन ( प्रायः मुलाचें ); मुलास बिघडविण्यासारखे लाड . ०वाडा पु. भिकार्यांची राहण्याची जागा . भिकार्यांचा समुदाय भिकार दिसणारें घर , इमारत . ०विकरी स्त्री. भिकार वस्तूंची विकरी . थोडकी विकरी ; अतिशय लहान प्रमाणांतील किरकोळ विकरी . ०सौदा पु. भिकार माल , वस्तु ; कोणताहि बेफायदेशीर व्यापार , करार ; भिकार खटलें , काम . ०हट पु. नीच , हलकट , अयोग्य खवखव , हांव , आग्रह . री हाड न . ( ल . ) भिकारी किंवा गरीब कुळी अत्यंत हीन असें जीवित हाडाचें दारिद्र्य . हाडींमाशीं खिळलेली दारिद्रता . भिकारी - पु . भीक मागणारा मनुष्य . दरिद्री , कगाल मनुष्य . वि. ( निंदार्थी ) कवडीमोल ; तुच्छ ; भिकारी ( मनुष्य , स्थळ , वस्तु ). हिताची गोष्ट न ऐकणारा ; लाभाविषयीं पराडमुख ; तोटा , नाश करणार्या कामाविषयीं तत्पर असा ( मनुष्य इ० ). म्ह० ( व . ) भिकार्याला ओकार्या = भिकार्याला आढ्यता फार .
|