Dictionaries | References

बचेंगे तो औरबी लढेंगे

   
Script: Devanagari

बचेंगे तो औरबी लढेंगे     

( ऐति. ) पानपतच्या लढाईपूर्वी दत्ताजी शिंदे हा अबदालीच्या सैन्याशीं लढतांना जखमी होऊन पडला. तेव्हां एका गिलच्या सरदारानें त्याला त्या स्थितींत प्रश्न केला, ‘ पटेल, हमारे साथ तुम और लढेंगे ? ’ तेव्हां दत्ताजीनें चटदिशीं वरील उत्तर दिलें. पण याचा परिणाम म्हणजे त्याचें शीर कापलें गेलें. तथापि या उत्तरावरुन मराठे सरदारांचें शौर्य कसें होतें तें दिसून येतें. यांतून जगलों तर करीन या अर्थी आज वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP