Dictionaries | References

तोडा

   
Script: Devanagari

तोडा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाची शिंगा खाशेले तरेन वांकडीं आसतात अशी नीलगिरी आनी ताच्या आशिकुशीच्या वाठारांनी मेळपी एके तरेची म्हस   Ex. तोडा एका दिसाक चार ते सात लिटर दूद दिता
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तोडा म्हस
Wordnet:
benতোরা মোষ
gujતોડા
hinतोड़ा
oriତୋଡ଼ା ମଇଁଷି
panਤੋੜਾ
urdتُوڑا , تُوڑابھینس

तोडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 The match of a gun. 3 A piece of rope or cord. 4 A ring of gold or silver for the wrist or ankle.
; to leave a recess or ledge.

तोडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A purse of money (commonly of 1000 pieces). The match of a gun. A ring of gold or silver for the wrist or ankle. A piece of rope or cord.

तोडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती   Ex. जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वात काकडा जामगी बत्ती
Wordnet:
gujપલીતો
hinतोड़ा
kanತೋಪಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚುವುದು
kasبٔتۍ
kokकाकाडो
malവെടിമരുന്നുതിരി
oriତୋଡ଼ା
panਤੋੜਾ
tamவெடியை பற்ற வைக்கும் திரி
telఫిరంగులు
urdتوڑا , پلیتہ , جامگی , بتی
noun  वैशिष्ट्यपूर्ण वळण असलेली नीलगिरीत आढळणारी म्हैस   Ex. तोडा दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতোরা মোষ
gujતોડા
hinतोड़ा
kokतोडा
oriତୋଡ଼ା ମଇଁଷି
panਤੋੜਾ
urdتُوڑا , تُوڑابھینس
See : वाळा

तोडा     

 पु. १ ( लांकूड इ० ) तोडण्याची क्रिया ; ( फुले , फळे इ० ) खुडण्याची , तोडण्याची , गोळा करण्याची क्रिया . ) क्रि० करणे ; काढणे ; घेणे ; उतरणे ; तोडणे ). २ ( लांकूड इ० कांचा ) तोडलेला भाग ; तुकडा ; ठोकळा ; ओंडा . सुतळीचा तोडा ३ ( बे . ) मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ] ०मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ]
 पु. १ सोन्याची , चांदीची - मोहरा , रुपये इ० हजार नाणी भरलेली पिशवी . - वाडमा १६४ . श्रावणमासी खर्चतो कोट्यावधि तोडा । - राला २ . १०१ . २ बंदुकीतील दारु पेटविण्याचा काकडा ; जामगी . पहार्‍यास शिपाई उभे पेटवुनी तोडा तोडा । - राला १०१ . ३ दोराचा , दोरीचा , सुतळीचा हात दोन हात लांब तुकडा . ४ कठिण व जाड जरतार . ५ ( दारुकाम ) फुलबाज्या , बाण इ० बांधण्याच्या उपयोगाचा चिखलांत भिजविलेला सुताचा दोरा , वाख . [ तोडणे ] तोड्याची बंदूक - स्त्री . तोड्याने , काकड्याने दारु पेटवून उडवावयाची बंदूक . इच्या उलट चापेची बंदूक .
 पु. १ ( सोनारी धंदा ) हातांत , पायांत घालावयाचा सोन्याचा , चांदीचा एक प्रकारचा दागिना . २ शिंदेशाही घडणीचीच पण क्वचित पोकळ बनावाची ( स्त्रियांच्या ) हातांतील सोन्याची जाड साखळी . ३ ( को . ) दरवाज्याच्या मुख्य चौकटीच्या वरच्या चौकटीची वगैरे तोड्यासारखी नक्षी . ४ ( पगडबंद ) सांखळीच्य कड्यांच्याप्रमाणे केलेले पागोट्यांतील बांधणीचे काम . ५ लुगड्याच्या कांठांतील कड्यांच्या सांखळीच्या आकाराची विशिष्ट रचना ( इं . ) डिझाईन .
 पु. ( वाद्य ) सतार वगैरे वाद्यांच्या गतीस शोभणारा स्वरसमूह ; तबल्याचा , नृत्याचा एक विशिष्ट बोल .
०उठविणे   ( चांदीच्या हत्यारांचा धंदा ) नग तयार झाल्यावर त्यावर झिलई करणे ; तकाकी देणे . शिंदेशाही तोडा पु . एक बोट जाडीच्या चांदीच्या , वर्तुळाकार कड्या करुन एका कडीची निमुळती टोके दुसर्‍या दोन कड्यांतून गोविली जातील अशा रीतीने त्या कड्या एकमेकांत अडकवून पायाच्या मापाचा हा दागिना करतात . क्वचित कड्यांना तोंडाशी मोगरे केलेले असतात किंवा मळसूत्र असते .
०साखळी  स्त्री. ( बैलगाडीचा धंदा ) बैलाच्या गळ्यांत घालावयाची पितळेची सांखळी .
०काढणे   आवणाच्या मुरगळलेल्या काड्या बेणणीबरोबर उपटणे . - बदलापूर २९४ .
०टाकणे   ( गवंडीकाम ) विहीरीच्या बांधकामांत , घराच्या भितींत - ती बांधीत असतांना - कोनाडा इ० करिता रिकामी जागा सोडणे . तोडातोडा डी स्त्री . १ सर्रास , सर्वसाधारण किंवा जोराची खापलण्याची , तोडण्याची , छाटण्याची , कापण्याची क्रिया ; छाटाछाट ; कापाकाप . २ ( ल . ) ( एकमेकांतील व जोराची ) सतावून सोडण्याची , छळण्याची , त्रास देण्याची क्रिया . ३ ( आईपासून मुलास , नवर्‍यापासून बायकोस कठोरपणाने ) तोडणे ; दूर ठेवणे ; ताटातूट , वियोग करणे . ४ कठोरपणे ताटातूट , वियोग झालेली स्थिति . [ तोडणे द्वि . ] तोडामोडा पु . १ ( मिळकती , दुकाने , धंदा , दागदागिने , सामानसुमान इ० ) मोडणे ; विकणे ; विल्हेवाट लावणे ; पैसे करणे . २ ( एखाद्या संघटित योजनेच्या , विधानाच्या , कारखान्याच्या अंगोपांगांची ) वाताहत , फाटाफूट करुन ते बंद , बरखास्त करणे . ( क्रि० करणे ). ३ ( एखादी इमारत , जिन्नस , धंदा इ० ) मोडकळीस येणे , आणणे ; मोडकळीस येऊ न देणे ; विस्कळीत होऊं देणे ; मोडतोड करणे ; नाश करणे . ४ विस्कळित , पांगापांग झालेली , उध्वस्त , नासधूस झालेली स्थिति . ( क्रि० करणे ; होणे ). [ तोडणे + मोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP