Dictionaries | References

आंकणा

   
Script: Devanagari
See also:  आंकडा , आंकडी , आंकण , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी

आंकणा     

पुन .
 पु. अंकित ; ताबेदार ; आज्ञांकित . तेजाचेआं आळवना । जेआं बारां हीं सूर्य्ये आंकनां । - शिशु ३९८ ; माझिया प्रतापें यमु आंकणां - कृमुरा ३ . ५४ ; विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा । कळिकाळ आंकणा मग तुम्हां । - निगा पृ . १५५ . [ आंकण पहा ]
पायांत घालावयाचा तोडा ( पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचें नांव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरुन ); पराक्रमसूचक पादभूषण . तो रणीं जिंतिला करुनि नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घाली । - एभा १९ . १४३ . [ सं . अंकन ]
( सामा . ) ब्रीद ; बिरुद ; ब्रीदावळी ; अलंकार ; भूषण . आंगाचेनि गोरेपणें । हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें । - शिशु ८०७ . हें आंकणें अनंता तुजचि साजे । - भाए ६५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP