|
पु. १ वायु ; वारा ; हवा . २ शरीरांतील तीन धातूंपैकीं एक ; त्रिदोषांपैकी एक . ३ संधिवात ; पेटका ; वळ वगैरे . ( क्रि०येणें .) [ सं .] स्त्री. १ बत्ती ; दिव्यांतील कापसाची सुताची पेळू ; देवापुढें लाववयाच्या निरनिराळया फेर्यांरुया वळ्या . उदा० बोटवात - १ सूत ; बेलवात - ३ . सुतें ; विष्णुवात - ५ . सुतें ; माणिकवात १ सूत ; रुद्रवास - ११ सुते ; पुरुषोत्तमवात - १५ सुतें ; गणेशवात - २१ सुतें ; ल ; गोकुळवात - ८ सुतें ; रामवात - १२ सुतें ; शिवरात्रवात - १००० सुतें इतरवाती - फुअवात , काडवात , पंचरत्नवात , अनंतवात , अधिक वात . घरोघरीं दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती। - घनः शामाची भूपाअळी . २ कोवळें बारीक पडवळ , शेंग , काकडी वगैरे , ३ ( ल .) ( नाविक ) गुंडाळलेलें शीड . ४ दिव्याचें नाक , निमूळता भाग ; समैती वाती ठेवण्याची जागा . ५ तेलवात या शब्दांचे संक्षिप्त रुप ; नंदादीपासाठी लावून दिलेली जमीन . ६ ( ल .) दिवा . रश्मि वातीविण न देखती । - ज्ञा ९ . ३०१ [ सं . वर्ति ] पु. ( काव्य ) झंझावात इ० पहा . ०चढणें वाताचा झटका येणें ; वातोन्माद होणें सामाशब्द - ०दोरा पु. गाभण प्राण्याच्या योनींतून स्त्रवणारा चिकट द्रव . ०कंटक पु. त्रिदोषांपैकी वातविकाराचा प्रकोप ; मुंगया येणें ; हुळहुळणें . ०पोत पु. ( द्य्वाची वात व देवीचा पोत ) ( ल .) सरळ सडसडीत , किरकोळ , बारीक व लांब वस्तु . अवयव आकृति खिली वातपोतसारखी । निवडणार निवडील असे जो रत्नाचा पारखी। - पला ४ . ३४ , वातरें , वातरें , वात्येरें -- न . १ समईंतील वाती लावणची खोबण . दोन वातेर्यांत दोन जुळ्या वाती जुळत होत्या . -- क्रोअकि ५४ . २ वती करावयाच्या उपयोगी फडकें ३ ( ल .) फाटकें वस्त्र ; लकतर्या ; चिंधया . [ वात ] ०कफज्वर पु. वात व कफ यांच्या प्रकोपामुळें येणारा ताप . ०कोश पु. ( शाप .) माशांची पिशवी ; ( या पिशवीमुळें माशांस पोहतां येतें ). ०गुल्म पु. संधिवात रोग ; पोटांतील वायु , पोटशूळ वगैरेसहि हा शब्द लवतात . ०चक्र न. १ झंझावात ; वावटळ ; भोंवरा २ वातावरन . ३ पृथ्वीभोंवतीचा अवकाश ; अंतरिक्ष ; वायुलोक . ०ज्वर पु. त्रिदोषांपैकी वात कुपित झाला असतां येणारा . ताप . ०नलिका स्त्री. ( शाप .) अपृष्ठवंश प्राण्यांच्या शरीरांतील वायुवाहक नळया . ०पित्तज्वर पु. वात व पित्त कुपित झाल्यामुळें येणारा ताप . ०पूरक --- न . ( शाप .) जोरानें वारा भरण्याचें यंत्र . ( इं .) फोर्ससपंप . यंत्र --- न . ( शाप .) जोरानें वारा भरण्याचें यंत्र . ( इं .) फोर्ससपंप . ०प्रकृति स्त्री. वातुळ , वातप्रधान शरीर . वात धातूचें आधिक्य असणारें शरीर . ०बद्ध वि. वातुळ ; वातप्रधान ; फोपशा . ०रक्त न. १ तीव्र संधिवाताचा विकार ; दूषित वायूच्या योगानें संचित रक्ताचा विकार - योग २ . २ . २ रक्तपिति ; महाव्याधि . वातरक्त कपरक्त । - गीता १३ . २४९७ . ०रोग पुं . संधिवात ; पेटके ; पित वातदोष . ०रोगी वि. वातरोग झालेला ०विकार पु. वातरोग . ०विध्वंस पु. वातविकारावरील रसायन ; वायूची मात्रा . व्याधि पुस्त्री . वातविकार . ०शूल पु. पोटशूळ ; वायगोळा ; पेटका . ०श्वासी वि. ( शाप .) वायूनें श्वासोच्छवास करणारे , श्वसन करणारे , हवा आंत घेऊन बाहे सोडणारे ( प्राणी ) वाताकर्षक यंत्र न . वायु ओडून घेणारें यंत्र , वाताकृति वि . चपळ ; वेगवान् अश्व मिरवले वाताकृते - नव ११ . ६३ [ वात + आकृति ] वातात्मज पु . १ मारुती . २ अग्नि . वातांबुपर्णाशन वि . वायु . पाणी व पाला यांवर निर्वाह करणारे . - एभा १४ . २५६ [ वात + अंबु + पर्ण + अशन ] वातासन न . खिडकी झरोका ; गवाक्ष . [ सं . वात + आयन ] वातासन - न . एक योगासन ; डाव्या पायाचा चवडा उजव्या मांडीवर चढवून खुब्यावर टेकोन उभें राहणें . - संयोग ३३५ . वातावरण न . १ पृथ्वीच्या भोंवतालचें वायूचें वेष्टण . २ ( ल .) परिस्थिति ; सभोवतालची स्थिति पुण्याचें वातावरण हल्लीं बरेंच स्वच्छ झालें आहे - केले २ . २ . ४ . [ सं . बात + आवरण ] वाताश पु . सर्प ; शेष . - वि वायुभक्षण करणारा . आंगे काजळ डोंगरु उमथला वाताश सेवी भला। - ग्रस्तो ८४ . वातूल न . वावटळ . वाडळ ; भोंवरा . वातिक वि . वातजन्य वातदोषांमुळें उत्पन्न होणारा वातूल , वातूळ -- वि १ वातकारक ; ज्यामुळें वातविकार उत्पन्न होतो असा . २ वातप्रकृतीचा ; फोपशा ; वातानें फुगलेला . [ वात ] वात्यां - पु . वादळ ; वावटळ . जसा पट टिकों दे वात्या। - मोकर्ण ११ . ५४ . [ वात ] वातोदर - न . वातयुक्त उदररोग ; गुबारा . वातोन्मान न . वायु . भरमापक यंत्र . वातोर्मि स्त्री . वार्यांची झुळूक , लाट , लहर .
|