|
उ.क्रि. १ दुसर्याच्या वस्तूच्या अपहार करणें ; दुसर्याची वस्तु त्याला न कळत लांबविणें . २ गुप्त ठेवणें ; दाबून , दडपून टाकणें ( एखादी गोष्ट , माहिती इ० ); ( सामा . ) लपविणें ; छपविणें . दृश्यास बाह्य संचलें । परी तें विश्वास चोरलें । - दा ९ . २ . ५ . ३ ( एखादी गोष्ट ) चोरून गुप्तपणें करणें . चोरणें हा शब्द पुढें जोडून अनेक वाक्प्रचार होतात . त्यापैकीं कांहीं पुढें दिले आहेत . अंग चोरणें = कुचराई करणें ; फार श्रम न घेतां काम करणें ; दिरंगाईनें काम करणें . अंग - हात - पाय - डोळे - चोरणें - हात , पाय इ० अवयव संकुचित , आंखूड करणें , ओढून घेणें . पान्हा चोरणें = पान्हून स्तनांत उतरलेल्या दुधाचें वर आकर्षण करणें ( गाय , म्हैस इ० नीं ). [ चोरी ] ( वाप्र . ) चोरून , मारून - क्रिवि . दुराचरणानें , चोरीमारीनें , बेकायदेशीर कृत्यें करून पोट भरणें . ( क्रि० जाणें ; येणें ; फिरणें ; शिनळकी करणें ) गुप्तपणें ; लोकांस न कळत ; चोरटेपणानें .
|