|
अ. क्रि . स . क्रि . वर येणें ; वर येण्याचे प्रकार -( अ ) पित्त , पुरळ , फोड , गळवें वगैरे शरीरावर उठणें , उत्पन्न होणें . गळूं कालच उचललें . ( आ ) पाण्यावर लाटा , बुडबुडे उत्पन्न होणें . जैशा उचलती लहरीवरी लहरी - दा ११ . ९ . १७ . ( इ ) जमिनीवर वारुळें , भोमे , उंचवटे तयार होणें . ( ई ) सारवलेल्या जागेवर खरपुड्या , पोपडे येणें ; वरचेवर सारवल्यानें जमीन लवकर उचलत नाहीं . ( उ ) आकाशांत ढग येणें . तेथें प्रळये मेघ उचलले । कठिण घोषें गर्जिन्नले । - दा १३ . ४ . १४ . वर करणें - धरणें ; उठावणें . अंगीकारणें ; स्वीकारणें ; पत्करणें ( काम , भाग , भूमिका प्रांत ). हातीं घेणें ; यंदा पैशाचें अळमटळम दिसतें आहे , नवें घर बांधावयाचें उचलूं नका लहानपणापासून यानें संसार उचलला . पुढें मूर्तिपूजा हळुहळु आर्यांनींहि उचलली असें दिसतें . - मसाप २ . २ . ११६ . वाढणें ; लठ्ठ होणें ; मोठे होणें . हा उकिरडा भारी लवकर उचलला ? उत्तेजन देणें ; उभा करणें ; मनांत भरविणें ; चेतविणें ; चेव आणणें ; इरेस पेटविणें ( वाद , मूल , इ . विषयीं ) त्याचे मनांत भाऊबंदांशीं आजच कजिया सांगावा असें नव्हतें परंतु लोकांनीं त्यास उचलला . उठावणी करणें . म्हणे पांडवसैन्य उचललें । - ज्ञा १ . ८८ . उंच होणें ; वाढणें ; अंकुर फुटून वर येणें . दोन दिवस पाऊस लागतांच झाडें उचललीं . लांबविणें ; चोरणें . उचलून येणें ; पोटांत अस्वस्थता वाटणें ; ढवळणें ; पित्त वर येणें ; ओकारी येणें ; मळमळणें . कालचे उपोषणामुळें क्षणोक्षणीं उचलतें . उचलून जाणें , येणें - वादाविषयीं , युध्दसंबंधीं आह्वान देणें ; वाद उत्पन्न करणें , ओढून आणणें , सुरुवात करणें ; चढाई करणें . जे जुंझावया उचलोनि आले असती . - गीताचंद्रिका १ . २२ . उचलून जाणें - लग्नास , विवाहास वरपक्षाच्या ठिकाणीं वधूपक्षानें इष्टमित्र आणि सामान यासह जाणें . उचलून बोलणें , गोष्ट सांगणें - उचल करणें ; रक्कम घेणें . उचलून आपटणें - वर उचलून खालीं टाकणें ; मोठ्या जोरानें आपटणें ; आदळणें . उचलून देणें - बढाई , बाता , झोकणें , मारणें . ( तुळशी , बेलपत्रें वगैरे वस्तू हातांत घेऊन ) शपथ घेणें ; कोणाच्या नांवानें ) संकल्प करणें . स्वसंतोषानें उक्ती रकम कोणेकास देणें ; ताठ्यानें उठून बोलणें . वेगळें काढून देणें . तूं आमच्यांत जेवायला आलास तर कसें तरी भागवितां येईल . तुला बोर्डिगांत रहावयासाठीं पांच रुपये उचलून देणें जड जाईल , वाटल्यास जेवणास ये . उचलून धरणें - आपला दर्जा न ओळखतां बोलणें . [ सं . उच्चलन ; सिं . उछिलणु ] सतावून सोडणें ; धरणें घेऊन बसणें ; खणपटीस बसणें ; तगादा लावणें ; ओढून धरणें ( भिक्षेकरी वगैरेनीं . ) भारी अटी लादणें ; जबर किंमत , व्याज मागणें ( सावकार वगैरेनीं ). एखाद्याचा विशिष्ट पक्ष स्वीकारणें ; जबाबदारी पत्करणें ; अभिमान बाळगणें ; समर्थन करणें ; आधार देणें . म्ह० उचलली जीभ लावली टाळ्याला = विचार न करितां मनास येईल तें बोलणें ; ताळतंत्र सोडून बोलणें .
|