|
स्त्री. घसा ; गळा . पूर्वी तुम्हां नाहीं भेटी । तरि कां येणें धरिली घांटी । - गीता २ . २२६१ . २ घाट ; कंठमणि ; कंठनाल ; नरडें . तिणें पसरितांचि जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी । आकळितां जिव्हा लडबडी । तंव घाटीबुडीं रिघाला । - भारा किष्किंधा १८ . ६८ . [ सं . घाट ] ( वाप्र . ) स्त्री. साखरेची गांठी . गांठी पहा . स्त्री. लहान घंटा ( बैल इ० पशूंच्या गळयांत बांधण्याची ); पितळी लहान घांट , घंटा . [ सं . घंटा ; म . घांट ] ०खालीं राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ . ०खाऊन मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें . उभे राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ . बोलणें मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें . ०खाजवणें ( व . ) घसा खवखवणें ०चिप्पचीप १ गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें . होणें १ गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें . ०पडणें ( व . ) आवाज बसणें . ०फुटणें बदलणें - १ ( मुलगा वयांत आल्यामुळें ) आवाज प्रौढ होणें . २ ( गाण्यांत ) आवाज बसणें ; आवाज घोगरा होणें ; कंठ फुटणें . ०बसणें ( ना . ) गळयांतील विकारामुळें आवाज बिघडणें . ०वर ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या . येणें ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या .
|