Dictionaries | References

चिकण

   
Script: Devanagari

चिकण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hard--stone: tough--wood: strong or stout--cloth, thread, paper: hardy, enduring, firm; capable of sustaining toil and privations--man or beast. 2 fig. Substantial; having some wealth or property. 3 Unctuous--soil or particular earths: also gummy, glutinous &c. 4 Thick, rich, butyraceous--milk or the animal yielding it. 5 Miserly, close-fisted, fast-griping.

चिकण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hard; tough. Fig. miserly; unctuous.

चिकण     

वि.  १ कठिण ( दगड ); चिवट ( लांकूड ); मजबूत ( कापड , कागद . दोरा ); कणखर ; दमदार ; कसदार ( मनुष्य , जनावर ). २ द्रव्यसंपन्न ( मनुष्य ). ३ चिकट ; स्निग्ध ( जमीन ). ४ ज्यांत कस विशेष आहे असें ( दूध ) किंवा असें दूध देणारी ( गाय ). ५ कंजूष ; चिक्कू ; कृपण . ६ गुळगुळीत . [ चिकट ] सामाशब्द - कांकडी - स्त्री . तवसें ; एक प्रकारची कांकडी . - कृषि ५८२ .
०खडू  पु. पांढरी माती ; एक प्रकारचा शाडू .
०चोपडा वि.  १ स्निग्ध ; चिकट ( जमीन ). २ गुळगुळीत ( दगड , कागद , लांकूड ). ३ मऊ , चिवट मजबूत ( रेशीम ) ४ चकचकीत ; पॉलिश केलेलें .
०चोपडें  न. जास्त तेल किंवा चरबी असलेलें स्निग्ध खाद्य , ओशट पदार्थ ( तेल , चरबी इ० चा ).
०जमीन  स्त्री. जिला चिकटपणा फार असतो अशी जमीन ; जींत वीस भागापेक्षां रेतीचा भाग कमी असतो , व ऐशीं भागांपेक्षां चिकणमातीचा भाग अधिक असतो अशी जमीन . - कृषि १६ .
०माती  स्त्री. फार चिकटपणा अंगीं असलेली माती ; अल्युमिना व सिलीका यांच्या मिश्रणानें बनलेली माती . - पदाव ३७ . - वट - वि . ओशट ; चिकट ( जमीन ).
०सुपारी  स्त्री. झाडावरून कच्ची काढून दुधांत शिजवून वाळविलेली सुपारी . चिकणसुपारी कात जो केवडयाचा [ सं . चिक्कण ]

चिकण     

चिकण मातीला ओल फार, करंट्या माणसाला बोल फार
चिकण माती लवकर वाळत नाही त्‍यामुळे तिचा चिकटपणा जात नाही, त्‍याप्रमाणें करंटा मनुष्‍य फार बडबड करून आपले दैन्य उघड करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP