|
स्त्री. ( संगीत ) एक रागिणी , राग . ह्या रागांत षड्ज , कोमल ऋषभ , कोमल गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . अरोहांत ऋषभ , धैवत वर्ज्य , जाति औडुव - संपूर्ण , वादी पंचम , संवादी षड्ज . गानसमय दिवसाचा चवथा प्रहर . - वि . मुलतान देशासंबंधीं . [ मुलतान ] ०कमान स्त्री. एक प्रकारचें धनुष्य . मी मुलतानी कमान कसवटी । - सला १ . ०माती स्त्री. एक प्रकारची चिकण माती .
|