Dictionaries | References क कमाण Script: Devanagari See also: कमान Meaning Related Words कमाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 कमाण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bow. The spring (of a watch &c.). An arch.कमान चढणें To dominate, to be in a position to crow over another. कमाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ . अर्ध वर्तुळ ; मेहेराप ( इमारतीच्या बांधकामांतील ). ( इं .) आर्च . बांधकामाचें वजन सारखें वांटले जावे म्हणुन जें दरवाजे , खिडक्या वगैरेवर गोल , निमगोल इ . प्रकारचें बांधकाम करतात तें . २ धनुष्य ; कमठा ; मुलतानी कमान ( धनुष्य ) फार प्रसिद्ध असून तिची उपमा नेहेमीं देण्यांत येते . ' आली वरिश्री हात कमान घातला । ' - ऐपो ८८ . ' मुलतानी भुवया कशा कमाणा जशा बाहार मधीं कुंकाचें टिकलीचा । ' - होला १०४ . ' दुरवर किर्ती हि गोष्ट आर्थी जशी काई कमान मुलतानी । ; - गापो ७ . ३ घड्याळ , कुलुप , उंदराचा सांपळा वगैरेमधील दाब उप्तन्न करणारी पोलादी कंसाकृति अगर वर्तुलाकृति तार किंवा पातळ पट्टीची रचना ; स्प्रिंग ; आडवी पट्टी . ' घड्याळांतील कमानीचा धर्म सुटण्याचा आहे . ती सारखी सुटण्याचा प्रयत्न करीत असते .' - सृष्टी २८ . ४ ( पिंजारीधंदा ) पिंजारी लोकांचे कापूस पिंजण्याचें हत्यार ( धुनुकली ). यास तांतलावलेली असते . ५ ( सुतारी , कंसारी ) सामता फिरविण्यासाठीं हात दीड हात लांब काठीच्या टोकास सुतळी बांधून केलेलें हत्यार , धनुकली . ६ ( ल .) इंद्रधनुष्य . ' विलसती गगनांत कमाना । ' - दावि ३७९ . ७ ( जरतारी धंदा ) तराकांतील फिरकी दाबून धरणारें साधन ; कुत्रे . ८ शरीराची विशिष्ट रचना ; हात व पाय जमिनीवर टेकून तोंड वरकरून पोटाचा भाग उंच उचलणें . ९ बैल गाडीस ( ऊन , पाऊस लागूं नये म्हणुन ) तट्ट्या घालण्यासाठीं आंतुन कळक किंवा वेत याच्या कांबी बांधतात त्या प्रत्येकी ( फा . कमान = धनुष्य )०काढणी स्त्री. घोड्याचा दागिना . - स्वप ५३ .०गार पु. १ धनुष्य बाण तयार करणारा . २ हाड वैद्य . ' खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली , मग कमानगार आणोन बांधली .' - रा . ३ . ११२ . ( फा . कमान् + गार् )०दार वि. १ मेहेराप , कमान असलेला ( अंगरखा , भिंत , वगैरे ). ( फा . कमान् + दार् ) २ ज्याच्या जवळ धनुष्यबाण आहे असा ; धनुर्धारी . ' मालजेठी कमानदार । ' - दावी ६९ .०मारी वि. धनुर्धारी ; धनुष्य बाण धारण करणारा . चित्रगुप्त ३० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP