Dictionaries | References

३२

   { बत्तीस }
Script: Devanagari

३२     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बत्तीस, बत्तीस

३२     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बत्तीस, बत्तीस

३२     

Sanket Kosh | Marathi  Marathi
बत्तीस अक्षरी मंत्र   
(अ) सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्राप्नुयात् (विश्वशांति मंत्र)
(आ) कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥ संकट नाशनाकरितां म्हटला जाणारा महामंत्र, (इ) हरेराम हरेराम हरेराम हरेहरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ' ([रामगीता १३-८])
बत्तीस अलंकार   
१ मणि, २ मंगळसूत्र, ३ वज्रटीक, ४ गळसरी, ५ पुतळ्यांची माळ, ६ ठुशी, ७ चंद्रहार, ८ हुल्लड पांच पदरी, ९ मूद, १० राखडी, ११ केकत, १२ केवडा, १३ कुर्डू, १४ कर्णफुल, १५ बाळ्या, १६ बुगडया, १७ बाजुबंद, १८ वाकी, १९ कंगण्या, २० गोट, २१ तोडे, २२ बांगडया, २३ बिलवर, २४ माजपट्टा, २५ शिंदेशाही तोडे, २६ तोरडया, २७ रणजोडबी, २८ जोडवी, २९ विरोद्या, ३० मासोळ्या. ३१ नथ व ३२ चमकी.
असे स्त्रियांचे पूर्वकाळीं प्रमुख बत्तीस अलंकार होते.
र्‍हाईबाईचें रूप नटला सावळा वनमाळी।
सोळा शिणगार बत्तीस अलंकारलेणीं त्याला सगळीं ॥ (पठ्ठे बापुराव लावण्या व गवळणी)
बत्तीस आसनें इहलोकीं सिद्धिप्रद   
१ सिद्ध, २ पद्म, ३ भद्र, ४ मुक्त, ५ बज्र, ६ स्वस्तिक, ७ सिंह, ८ गोमुख, ९ वीर, १० धनुरासन, ११ शव, १२ गुप्त, १३ मत्स्य, १४ मत्स्येन्द्र, १५ गोरक्ष, १६ पश्चिमोत्तान, १७ उत्कट, १८ संकट, १९ मयूर, २० कुक्कुट, २१ कूर्म, २२ उत्तानकूर्मक, २३ उत्तानमण्डुक, २४ वृक्ष, २५ मण्डुक, २६ गुरुड २८ वृष, २८ शलभ, २९ मकर, ३० उष्टु, ३१ भुजंग आणि ३२ योगासन.
"द्वात्रिंशदासनानि तु मर्त्यलोके च सिद्धिदम् ॥ ([सु.])
बत्तीस उपराग   
१ शंकराभरण, २ यमनकल्याण, ३ पूर्वी, ४ भैरवी, ५ कलिंगडा, ६ काफी, ७ तोडी, ८ पिलु, ९ सोहनी, १० ललन, ११ शंकर, १२ भूप, १३ देशकार, १४ सांरग, १५ मालकंस, १६ धानी, १७ तिलंग, १८ खमांज, १९ बागेसरी, २० बिहाग, २१ भीमपलासी, २२ सिंदुरा, ३३ मुलतानी, २४ देस, २५ जीवनपुरी, २६ आसावरी, २७ वसंत, २८ दरबारी कानडा, २९ हमीर, ३० केदार, ३१ तिलककामोद व ३२ अडाणा (गायनवादन शिक्षक)
सहा राग रागिणि सहित ॥ पुत्र जातक छत्तीस ॥
कळा बाहात्तर अभ्यास ॥ बावीस श्रुति ॥
मूर्छना एकवीस ॥ सप्तस्वर तान एकुणपन्नास ॥
बत्तीस उपराग अभ्यासिले ([काशीखंड ६-३०])
बत्तीस औषधें शांतिप्रीत्यर्य   
१ उंबर, २ कुश, ३ दूर्बा, ४ कमळ, ५ चांफा ६ बेल, ७ विष्णुक्रांत, ८ तुलसी, ९ वाळा, १० शंखाहुळी, ११ शतावरी, १२ आस्कंद, १३ निर्गुंडी, १४ पांढर्‍या मोहर्‍या, १५ लाल मोहर्‍या, १६ (जीवक) अघाडा, १७ पळस, १८ फणस, १९ कांटेरी आसाणा, २० राळे, २१ गहूं, २२ भात, २३ पिंपळ, २४ दूध, २५ दहीं, २६ तूप, २७ कमळाचें पान, २८ कमळ, २९ तीन प्रकारच्या कोरांटी ३० गुंजा, ३१ वेखंड आणि ३२ नागरमोथे. (संस्कार कौस्तुम)
बत्तीस प्रकार सूत्र - स्वरूप - लक्षणांचे   
१ प्रतिज्ञासूत्र, २ प्रमाणसूत्र, ३ द्दष्टांतसूत्र, ४ उपपत्तिसूत्र, ५ व्यावृत्तिसूत्र, ६ विषयप्रदानसूत्र, ७ विशेषप्रबोधकसूत्र, ८ उत्सर्गसूत्र, ९ अपवादसूत्र, १० निषेधसूत्र, ११ न्यायसूत्र, १२ विरोधपरिहारसूत्र, १३ काकुसूत्र, १४ कथासूत्र, १५ भावार्थसूत्र, १६ प्रकरणसूत्र, १७ आस्तित्वसूत्र, १८ निर्देशसूत्र, १९ निर्णयसूत्र, २० पक्षसूत्र, २१ प्रमेदसूत्र, २२ आशंकासूत्र, २३ आक्षेपसूत्र, २४ कार्यसूत्र, २५ लक्षणसूत्र, २६ स्वरूपसूत्र, २७ कारणसूत्र, २८ हेतुसूत्र, २९ संबंधसूत्र, ३० प्रतीतिसूत्र, ३१ विशेषणसूत्र, आणि ३२ प्रतिष्ठासूत्र,
अशा बत्तीस लक्षणांनीं युक्त असलेला भाव ज्यांत प्रतीत होतात त्यास"सूत्र स्वरूप"म्हणतात. (श्रीचक्रधर सिद्धांत सूत्रें)
बत्तीस प्रमुख विद्या   
विद्या अनंत असल्या तरी या बत्तीस विद्या प्रमुख विद्या होत - ४ वेद, ४ उपवेद, ६ वेदांगें मिळून १४ व १५ मीमांसा, १६ तर्क, १७ सांख्य, १८ वेदांत, १९ योग, २० इतिहास, २१ पुराणें, २२ स्मृति, २३ नास्तिकमत, २४ अर्थशास्त्र, २५ कामाशास्त्र, २६ शिल्प, २७ अलंकृति, २८ काव्य, २९ देशभाषा, ३० अवसरोक्ति, ३१ यावनमत व ३२ देशादिधर्म, ([शुक्रनीतिसार])
बत्तीस ब्रह्म विद्या   
१ सद्विद्या, २ आनंदविद्या, ३ अंतरादित्य विद्या, ४ आकाशविद्या, ५ प्राणविद्या, ६ गायत्री - ज्योतिविद्या, ७ इंद्रप्राणविद्या, ८ शाण्डिल्यविद्या, ९ नाचिकेतसविद्या, १० उपकोसलविद्या, ११ अन्तयामीविद्या, १२ अक्षरविद्या, १३ वैश्वानर विद्या, १४ भूमाविद्या, १५ गार्ग्यक्षरविद्या, १६ प्रणवोपास्यपरमपुरुषविद्या, १७ दहरविद्य, १८ अगुष्वप्रमितविद्या, १९ ज्योतिविद्या, २० मधुविद्या, २१ संवर्गविद्या, २२ अजाशारीरकविद्या, २३ बालाकिविद्या, २४ मैत्रेयीविद्या, २५ द्रुहिणरुद्रादिशारिरकविद्या, २६ पंचाग्निविद्या, २७ आदित्यस्थाहनामिकविद्या, २८ भामकविद्या, २९ पुरुषविद्या, ३० ईशावास्यविद्या, ३१ उषास्तिकवेलविद्या आणि ३२ व्याद्दष्टिशारीरकविद्या. ([कल्याण उपनिषद् अंक])
बत्तीस मतवादी सृष्टीच्या उत्पत्तिसंबंधी   
१ प्राणोपासक व वैशे षिक, २ चारभूतें व स्थूलदेह हेंच जगत् कारण मानणारे, ३ सत्त्व, रज व तम हे त्रिगुणच जगाचे कारण मानणारे, ४ शैव, ५ पादवेत्ते (विश्व तैजस व प्राज्ञ हे पाद जगन्निर्मितीचे कारण मानणारे), ६ वात्सायनादिक - शब्दादि विषय हेंच मानणारे, ७ पौराणिक, ८ मीमांसक, ९ वेदपाठक, १० बौधायन अग्निहोत्रादि यज्ञ हेच जगाचे मानणारे, ११ सांख्य, १२ सूपशास्त्रवेत्ते, १३ वैशेषिक (अणुवादी), १४ चार्वाक - स्थूल देह हेंच जगाचें कारण मानणारे, १५ सांप्रदायिक, १६ शुन्यवादी, १७ कालवादी, १८ दिशावादी, १९ धातुवादी, २० भुवनकोश वेत्ते, २१ बौद्ध - मन हेंच जगाचे कारण मानणारे, २२ बुद्धि हेंच जगाचे कारण मानणारे, २३ चित्त हेंच मानणारे, १६ सेश्वरसांख्या, २७ पाशुपत, २८ अनंत तत्त्वें मानणारे, २९ लोकतंत्रवेत्ते, ३० दक्ष प्रभृति स्मृतिकार, ३१ वैयाकरण आणि ३२ परब्रह्म व अपरब्रह्म म्हणजे ओंकार हेंच जगाचे कारण मानणारे असे बत्तीस मतवादी सृष्टीच्या उत्पत्तिसंबंधीं विचार करणारे प्राचीन काळीं होऊन गेले. (मांडूक्यकारिका वैतथ्य प्रकरण)
बत्तीस लक्षणें (मनुष्य शरीराचीं)   
पांच ठिकाणें सूक्ष्म म्हणजे बारीक असावीं :- १ त्वचा, २ केस, ३ अंगुली, ४ दांतु, ५ बोटाची पेरें ;
पांच ठिकाणें दीर्घ म्हणजे लांब असावीं :- ६ भुज, ७ नेत्र, ८ हनुवटी, ९ जांघ व १० नाक ;
सात ठिकाणें आरक्त असावीं :- ११ हाताचे तळवे, १२ पायाचे तळवे, १३ अधरोष्ठ, १४ नेत्र, १५ तालु, १६ जीभ व १७ नखें ;
सहा ठिकाणें उन्नत असावीं :- १८ वक्षःस्थळ, १९ कुक्षी, २० केस, २१ खांदे, २२ हात व २३ तोंड ;
तीन ठिकाणें विस्तीर्ण म्हणजे रुंद असावीः - २४ वक्षःस्थळ, २५ कटि व २६ ललाट ;
तीन ठिकाणें ‍‍ र्‍हस्व म्हणजे आखूड असावीं :- २७ ग्रीवा, २८ जंघा व २९ शिश्न ;
तीन ठिकाणें गंभीर असावीं :- ३० स्वर, ३१ कर्ण व ३२ नाभि.
पंच सूक्ष्मः पंच दीर्घः सप्त रक्तः षडुन्नतः।
त्रिःपृथुर्लघुगंमीरो द्वात्रिंशल्लक्षणः पुमान् ॥ (बौद्ध - धर्मसारसंग्रह)
एकूण हीं मनुष्य शरीराचीं बत्तीस शुभ लक्षणें होत. ([काशीखंड अ. ४१]) या वत्तिसांत सर्वश्रेष्ठ नाक हें आहे.
तुका म्हणे काय करावीं तीं बत्तीस लक्षणें।
नाक नाहीं तेणें वाया गेलीं ॥ ([तुकाराम])
बत्तीस लक्षणें शककर्त्या शिवाजीचीं   
१ निश्वयाचा महामेरू,
२ बहूत जनांसी आधारू,
३ अखंड स्थितीचा निर्धारू,
४ श्रीमंत योगी,
५ परोपकारी,
६ नरपति,
७ हयपति,
८ गजपति,
९ गडपति,
१० भूपति,
११ आदिशक्ति - पृष्ठभागी,
१२ यशवंत,
१३ कीर्तिवंत,
१४ सामर्थ्यवंत,
१५ वरदवंत,
१६ पुण्यवंत,
१७ सुकृति,
१८ नीतिवंत,
१९ जाणता,
२० आचारशील,
२१ विचारशील,
२२ दानशील,
२३ धर्मशील,
२४ सर्वज्ञ,
२५ सुशील सकळांठायीं,
२६ धीर,
२७ उदार,
२८ सुंदर,
२९ शूर,
३० क्रियेशीं तत्पर,
३१ सावधानी व
३२ देव - धर्म - गोब्राह्मण संरक्षण समर्थ.
([दासायन])
बत्तीस शुभ लक्षणें (सामुद्रिक)   
१ छत्र, २ कमल, ३ धनुष्य, ४ रथ, ५ वज्र, ६ कांसव, ७ अंकुश, ८ विहीर, ९ स्वस्तिक, १० तोरण, ११ चामर, १२ सिंह, १३ वृक्ष, १४ चक्र, १५ शंख, १६ हत्ती, १७ समुद्र, १८ कलश, १९ प्रासाद, २० मच्छ, २१ यव, २२ स्तंभ (स्तूप), २३ सूर्य, २४ कमंडलु, २५ पर्वत, २६ चवरी, २७ दर्पण, २८ उक्षा (वृष), २९ पताका, ३० लक्ष्मी, ३१ पुष्पमाला व ३२ मयूर.
हीं बत्तीस लक्षणें पुण्यवान् राजपुरुषाच्या ठिकाणीं असतात. असे हस्ती संजीविनी ग्रंथांत सांगितलें आहे. (हस्तसामुद्रिक शास्त्र)
बत्तीस विद्या (शिल्पशास्त्र)   
१ वृक्षविद्या, २ पशुविद्या, ३ मनुष्यविद्या, ४ संसेचनविद्या, ५ संहरणविद्या, ६ स्तंभनविद्या, ७ द्दतिविद्या, ८ भस्मीकरणविद्या, ९ संकरविद्या, १० पार्थयविद्या, ११ तरीविद्या, १२ नौविद्या, १३ नौकाविद्या, १४ अध्वविद्या, १५ पथविद्या, १६ घंटापथविद्या, १७ सेतुविद्या, १८ शकुंतविद्या, २३ प्रासादविद्या, २४ दुर्गविद्या, २५ कूटविद्या, २६ आकरविद्या, २७ युद्धविद्या, २८ आपणविद्या, २९ राजरालयविद्या, ३० नगररचनाविद्या, ३१ वनोपवविद्या. व ३२ देवालयविद्या.
शिल्पशास्त्रांत अगणित विद्या आहेत, त्यापैकीं बत्तीस विद्या व चौसष्ट कला मुख्य आहेत.
विद्या ह्मनंताश्च कलः संख्यातुं नैव शक्यते
विद्या मुख्यास्तु द्वात्रिंशच्चतुःषष्टिः कलाःअ स्मृताः ॥ ([भृगुसंहिता अ. १])
बत्तीस वैज्ञानिक रहस्यें (विमानशास्त्र)   
१ मांत्रिक रहस्य, २ तांत्रिक रह्स्य, ३ कृतक रहस्य, ४ अंतराळ रहस्य, ५ गूढ रहस्य, १० संकोचन रहस्य, ११ विस्तृत रहस्य, १२ विरूपकरण रहस्य, १३ रूपान्तर रहस्य, १४ सुरूप रहस्य, १५ ज्योतिर्भाव रहस्य, १६ तमोमय रहस्य, १७ पलय रहस्य, १८ विमुख रहस्य, १९ तार रहस्य, २० महाशब्द विमोहन, २१ लंघन रहस्य, २२ सार्धगमन, २३ चापल रहस्य, २४ सर्वतोमुख रहस्य, २५ परशब्द ग्राहक रहस्य, २६ रूपाकर्षण रहस्य, २७ क्रियाग्रहण रहस्य, २८ दिक् प्रदर्शन, २९ आकाशाकार रहस्य, ३० जलदरूप रहस्य, ३१ स्तब्धीकर रहस्य व ३२ कर्षण रहस्य, (यंत्रसर्वस्वे विमान प्रकरणम्)
बत्तीस सिद्ध (रसग्रंथकार)   
१ अगस्ति, २ अग्निवेश, ३ अन्नंपोतमदास, ४ अष्टावक्र, ५ अश्चिनौ, ६ कालनाथ, ७ काश्यप, ८ काशीराजा, ९ कृष्णात्रेय, १० गहनानंद, ११ गोरखनाथ, १२ चंद्रट, १३ चंद्रनाथ, १४ त्रिपुरांतक, १५ धन्वतरि, १६ नंदिनाथ, १७ नागर्युन, १८ नित्यनाथ, १९ भृगु, २० भैख, २१ भालुकि, २२ मंजुनाथ, २३ मन्थान भैतव, २४ मत्स्येंद्रनाथ, २५ रेवणसिद्ध, २६ वासुदेव, २७ विष्णु, २८ विद्यनाग, २९ शंभु, ३० पूज्यपाद गोविंद, ३१ सिद्धनाथ व ३२ सोमनाथ, (रसयोग सागर)
सिंहासन बत्तिशी   
एक कथासंग्रह. राजा विक्रमाचे रत्नजडित सिंहासन भोजराजास भूमिगर्भांत एके ठिकाणीं सांपडलें, तें बत्तीस हात लांब व आठ हात उंच व बत्तीस रत्नजडित पुतळ्या जडविलेलें होतें त्यांचीं नांवें :-
१ जया, २ विजया, ३ जयंती, ४ अपराजिता, ५ जयघोषा, ६ लीलावती, ७ मंजुघोषा, ८ जयसेना, ९ मदनसेना, १० मदनमंजिरी, ११ श्रृंगारकलिका, १२ नरमोहिनी, १३ भोगनिधि, १४ रतिप्रिया, १५ सुमित्रा, १६ प्रेमावती, १७ सुलभा, १८ कुरंगनयना, १९ चंद्रज्योति, २० चंद्रकांति, २१ सौभाग्यमंजिरी, २२ लावण्यवती, २३ करुणावती, २४ हंसगमना, २५ रूपकांता, २६ देवानंदा, २७ देवांगना, २८ चित्रिणी, २९ सुलोचना, ३० पेमावती, ३१ गुणप्रिया व ३२ चित्रकला.
या बत्तीस पुतळ्यांनीं राजा भोज सिंहासनावर आरोहण करूं लागतांच मनुष्यरूप धारण करून त्यास विक्रमाच्या शौर्य, घैर्य वगैरे गुणांबद्दल सांगितलेल्या बत्तीस गोष्टी दिल्या आहेत. त्यांस 'सिंहासन बत्तिशी' म्हणतात. (सिंहासन बत्तिशी)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP