|
स्त्री. नुकती प्रसूत झालेली स्त्री . ( क्रि० होणें ).
( व . ) आपली फाजील काळजी घेणारा मनुष्य ; स्वत : चें नेहमीं कोडकौतुक करणारा इसम . आली बाळंत डोकें गुंडाळून . [ सं . बालवती ]
०काढा पु. बाळंतिणीस वैद्यकांत सांगितलेला द्यावयाचा काढा . ०खोली स्त्री. बाळंत होण्याची खोली ; ज्या खोलींत बाळंत स्त्री असते ती खोली . ०घर न. ज्या खोलींत किंवा घरांत स्त्री बाळंत झाली आहे त्याला सोहेर फिटेपर्यंत ( दहा दिवस ) म्हणतात
बाळंतखोली . ०चुडा पु. बाळंतिणीचा सोहेर फिटल्यानंतर तिला भरावयाच्या बांगड्या . ०निंब पु. निंबाची एक जात ; कडुनिंब . ०पण न. प्रसूति .
बाळंतिणीची चाकरी ; सुश्रूषा . ( ल . ) एखादें कार्य होऊन गेल्यावर त्यासंबंधीं पुढें करावयाची व्यवस्था . ०बोळ पु. काळा बोळ ; हा एका झाडाचा वाळलेला डिंक असून बाळंतिणीला देतात . बाळंतर , बाळंतेर , बायंटेर पुन . ( गो . ) बाळंतपण . बाळंत रोग पु . बाळंतिणीस होणारा क्षयरोग ; सूतिकारोग . याचीं लक्षणें :- ज्वर , अतिसार , ग्लानि , शूळ , अशक्तपणा इ० . हा रोग कष्टसाध्य आहे . ०विडा पु. बारशाला किंवा त्यानंतर बाळंतिणीस तिच्या इष्टमित्रांनीं , नातेवाईकांनीं द्यावयाचा विडा , ओटी , खण , कुंची , बाळलेणें इ ०शोप, ०शेप स्त्री . शेपेचा एक प्रकार ; यापासून औषधी तेल निघतें . ही स्निग्ध व गोड असते . पानथरी , जंत व मूळव्याध या रोगांवर वातकफावर उपयोगी आहे . [ सं . शतपुष्पिका ; हिं . सोयासोयेके बीज ] बाळंतीण - स्त्री . नुकतीच प्रसूत झालेली स्त्री . बाळंत बाळंतें बाळांतें बाळवतें - नअव . बाळंतिणीच्या मुलाचीं आणि तिचीं वस्त्रें इ० त्रिभुवनपाळा बाळांत्याचें पांघरवीजे लुगडें वो । - मध्व २३ .
|