|
क्रि. १ चटकन् निघून जाणें ; सटकणें पहा . [ हिं . छुटकना ] सुटका - स्त्री . १ मुक्तता ; मोकळीक . २ प्रसूति ; बाळंत होणें . [ हिं . छुटका ] सुटगांठ - स्त्री . सुरगांठ पहा . सुटणूक - स्त्री . मुक्तता . सुटणें - अक्रि . १ मोकळें होणें ; स्वतंत्र होणें ; बंधनकरार - दाब - त्रास - घोटाळा इ० तून मुक्त होणें . २ अलग होणें ; विभाग पडणें ; गांठ - संबंध - संगत इ० मधून मोकळें होणें ; विलग , वियुक्त होणें . ३ भंगणें ; फुटणें . ४ उद्भवणें ; फुटणें ; बाहेर पडणें ( घाम , कंप , कंड ); पाझर फुटणें ; वास येणें ; भीति - राग - रोग - जुलूम - अरिष्ट इ० चा प्रादुर्भाव होणें ; वारा - पाऊस इ० सोसाटयानें वहाणें ; आग - वणवा पेटणें . ५ बैल - घोडा भडकणें किंवा भरधांव पळणें ; दाब - बंधन नसणें ; मोकाट धावणें ; स्वैरपणें संचरणें ; एखादें कामधंदा इ० करण्यास बेदरकारपणें तुटून पडणें ; मनमुराद व बेमुर्वतपणें एखादें कृत्य करीत सुटणें . तो मारीत - शिव्या देत - बोंबलत - पळत - सुटला . ६ बार होणें , उडणें ; स्फोट होणें ( तोफ , बंदुक इ० चा ). ७ मर्यादेबाहेर मोठें होणें ; वातांनें फोपसें होणें ( पोट अंग ). [ सं . श्वठ् ] सुटला - वि . ( व . ) फालतू ( माणूस ). सुटल्या सारखा - वि . आधाशी . सुटसुटीत - वि . चपळ ; मोकळाचाकळा ; नीटनेटका ; आखुड व बांधेसूद ; हलका व मजबूत ; तडफदार व चलाख ( माणूस , शरीराचा बांधा ); टुमदार व छोटें ( घर ); सोईस्कर व मर्यादित ; आटोपशीर ( काम , धंदा ); लहान पण व्यवस्थित ; बोजड नसलेलें . सुटा - वि . १ ढिला ; मोकळा ; अलग ; न गुंतलेला . ३ गर्दी नसलेला ; विरळ ; फट , अंतर पडलेला . ४ एकटा ; वेगळा ; निराळा . ५ न अटकलेला ; कामांत नसलेला . ६ मुक्त ; सुटलेला ( कर्ज इ० मधून ); हाताचा सुटा = उदार . सुटारु - स्त्री . ( कु . ) वाईट चालीची स्त्री . सुटावणें - अक्रि . १ सुटणें ; मोकळा होणें ; विस्कळित होणें ; ढासळणें ( गवताचा भारा , गंज इ० ). २ ओलीनें फुगोटा येणें ( मातीची भिंत इ० स ); वाढणें ; सुजणें ; मोठें होणें ( पोट इ० ); चैनीनें शरीर फोपसें , लठ्ठ होणें . ३ जागेवरून घसरणें ( तुळई इ० ). सुटा स्वर - पु . ( संगीत ) ज्यावर गायक थांबून रागरक्ति वाढवितो तो स्वर . सुटिक , सुटिका - स्त्री . १ ( काव्य ) सुटणूक ; सुटका . २ वर्षाव ; वृष्टि . पर्जन्याची सुटिका जैसी । - ज्ञा ११ . ६८६ . सुटी , सुट्टी - स्त्री . मोकळीक ; रजा ( काम , अभ्यास इ० मधून ); कामास टाळा ; नागा दिवस . [ हिं . छुट्टी ] सुटी करणें - ( कु . ) नीट करणें ; निवडणें ( धान्य ). सुटुक - न . ( व . ) लचांड . सुटुबुटु - स्त्री . निरर्थक हालचालं ; रिकामी चुळबुळ . ( क्रि० लावणें ; मांडणें ; करणें ). - क्रिवि . आळसानें ; मागेंपुढें करून , निरर्थक प्रकारें . सुट्टा - क्रिवि . ( व . ) पहिल्यानें ; प्रथम . पहिले सुट्टा तो माझ्या घरीं आला . सुट्टी बाहेरील टांग - स्त्री . ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक पेंच . सुटयो - न . १ ( कों . ) देणेंघेणें पूर्ण करणें ; कर्जफेड , ऋणमुक्तता . २ - उद्गा . मुलांच्या खेळांतील अटीतून मोकळीक करण्याविषयीं , आंधळयाचे डोळे सोडण्याविषयीं एक संज्ञा .
|