मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
सोन्यायाचा विटीदांडूं कि...

नागपंचमी - सोन्यायाचा विटीदांडूं कि...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


सोन्यायाचा विटीदांडूं किष्णानं डाव मांडीयीला

तिकून आली गवळ्याची राई तिनं उचलूनी नेईला

तिथून किसना निगाला गेला आईच्या जवळी

आई माजी तूं हुशील चेंडूफळी आनीशील

गवळ्याच्या राईनं ग नेली माजी चेंडूफळी

तिथून आई जी निगाली आली गवळवाड्यायाला

अग अग राई, गवळ्याचे बाई दे किष्णाची चेंडूफळी

तुमी कशाला आत्याबाई ज्येची त्येला धाडून द्यावा

तिथून किष्ण निगायीला गेला बापाच्या जवळी

बाप माजा हूशीला चेंडूफळी आनीशीला

गवळ्याच्या राईनं वो नेली माजी चेंडूफळी

तिथून बापजी निगाला आला गवळवाड्याला

अग अग राई, गवळ्याचे बाई दे किष्णाची चेंडूफळी

तुमी कशाला आला मामूजी ज्येची त्येला धाडून द्यावा

तिथून किसना निगाला आला गवळ्याच्या वाड्या

अग अग राई, गवळ्याचे बाई दे माजी ग चेंडूफळी

यावं वाड्यायाच्या आंत मग मी दीन चेंडूफळी

यावं माज्या पलंगावरी मग मी देतें चेंडूफळी

आलों ग तुज्या पलंगावरी दे माजी ग चेंडूफळी

माज्या हातचा इडा खावा मग मी देंतें चेंडूफळी

खाल्ला ग तुज्या हातचा इडा दे माजी ग चेंडूफळी

राईनं दिली चेंडूफळी खुशी आला वनमाळी

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP