तितनं धांवत पळत गेली लालनी बागेंत
तितं गवळ्याचा गोइंदा बाई निजरं सुर्म झाला
आरं आरं गोइंदा जाग व्हावं झडकरी
साकरचं पोतं बाई फेकीतें मी अंगावरी
जाग व्हा जाग व्हा वो मुकुंदा वो मुरारी
सुपारीचं पोतं बाई फेकितें मी अंगावरी
जाग व्हा जाग व्हा मुंकुंदा वो मुरारी...
घातला उशीखालीं हात घेतला नवलाखी हार
तितनं धांवत पळत आली आपुल्या वाड्याला
किष्ण बाई जागा झाला गडबडून उठयीला
वारं तरी सुटूनी का आंबा तरी पडूं नी का
मग मीं जागा झालों असतों जाग मला आली असती
इडा तरी खाल्ला असतां मग मीं हार दिला असतां
रंग तरी खेळलों असतों मग मीं हार दिला असतां