मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
घराचा घरधंदा मी करतें ...

नागपंचमी - घराचा घरधंदा मी करतें ...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


घराचा घरधंदा मी करतें

पाण्याला एकलि जातें...घराचा घरधंदा...

जिवू बाई करींदिरा कामानी

जातें माहेराला...घराचा घरधंदा...

कधीं मीं सोडिला का घराचा उंबरठा

कधीं हा भेटला का बाप माझा गोमटा...घराचा घरधंदा...

कधीं मीं सोडिली का घराची पायरी

कधीं ही भेटली का आई माझी सोयरी...घराचा घरधंदा...

कधीं मीं सोडिला का दारींचा पिंपळ

कधीं हा भेटला का भाऊ माझा विठ्ठल...घरचा घरधंदा...

कधीं मी सोडिली का नदीची साकळी

कधीं ही भेटली का भैन माझी धाकली...घराचा घरधंदा...

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP