दिवस कुठं जी मावळला
चंद्र कशानं कोम्याला बाई
दिवस कुठं जी मावळला
दादा आल्याती निय्याला
रजा द्यावी मला जायाला
रजा न्हाई मी दियाची
बदमी खरकी लावायची
बदमी खरकी नेल्या त्या तोडूनी
भैनाला निय्याची म्हायारीं
चल चल भैना झरझरी
शाळू दिवस कानेली
कशी मी दादा चालूं जी
पायांत साकळ्या जाड जी
दे जा टाकून हिन्नाच्या
घालिन घडवीन चांदीच्या