गाई चरती जमुना तीरीं
तिला ग राखन कृष्णहरी...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचं शिंग
जसं म्हादेवाचं लिंग...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईची मांडी
जशी पालखीची दांडी...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचं पोट
जशी कापसाची मोट...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईन कान
जसं नागवेलिचं पान...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईची पाट
जशी म्हादेवाची वाट...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचं नाक
जसं कोलापुरी माप...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचा गळा
जसा म्हादेवाचा मळा...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईची कास
धार काडीतो हारीचा दास...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचे डोळे
जसे लोणीयाचे गोळे...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचं तूप
जसं म्हादेवीचं रूप...ग गोकूळच्या नारी
गाई भरूनि गाईचं दावं
हात जोडीत सर्वां जावं...ग गोकूळच्या नारी