पंचमी आली बुधवारीं पुस नक्षीत्रावरी
देवई नातू झाला वसुदेव आनंदला
चोपुनी केली भुई चवरंग त्या ठाई
वर बसवूं रखमाबाई पंचमी ग येग बाई
केळीचे रवले खांब
कुरळे केस विंचरी
वेनी गुंफित्यात नारी
वेनीयीचा साज झाला
पिवळ्या नागायाची मुद
हारपाळ खेडी पुतळी
काखत खेडी कोयाळी
कोथिंबिरी मेन बाळी
पंचीम बुधवारीं आली