माहेरीचो गे देऊ
सपनी सदा येता
उशाला माणी देता
माझी खबर सदा घेता ।१६६।
पंढरेचे वाटे
भाबळीचे काटे
चल जाऊ भेटे
विठ्ठल रुक्मीणीचे. ।१६७।
माहेरीचो माझे देव
राहिता एकुलो
मोतीया पिकलो
सातेरी बाईच्या देऊळात ।१६८।
एकाचो गे मागारी
दोघीच्या गावी गेलो
एकीन बसकार केलो
एकीन माघारी परतलो ।१६९।
माझे घरी गे पाऊणो
त्याका दिया गे म्हनी पानी
जळो जे तुमची म्हनी
आधी पाठ्या माझी राणी
गेलो गे एके वनी
थुंय नारीन ईच्यार केलो
'कोणाचो कोण तिंया ?
'मीया जातीयो म्हार हायी'
पंचवीस पुसूळ्यांची तुझ्या
गळी मी हार घाली
जळलो रे तुझा हार
सूर्यासारखो भरताद. ।१७०।
शेजारनी गे बाई
तुझा धुल्लड दि गे जाया
जाते मी परगावा
बंधुरायाची कन्या मांगा
तिडीळे तीन माड
तुझ्या कन्येची कसली जोड
सोना घालीन भारंभार
कन्या हाडीन मजेवार
भाऊ गे झालो येंयी
भावजय झाली येंन.
भाची केली सून
आता कैशाचा अभिमान ? ।१७१।