दारातल्या गे तुळशी,
तिथा होतय चिखलात.
लाडको बंधू माझो,
तिका हाडिता देऊळात. ।१६।
सांगान मीया धाडी,
वाटेचे रोहिणीला.
पाठीच्या बहिणीला,
माझे गोरीये येऊ सांगा. ।१७।
लांबनी रूंद गाव
मीया एकटी कशी जाऊ ?
लाडको बंधू माझो,
आ चंद्रिमा बहिणी पाऊ. ।१८।
नदीच्या पयलाडी,
कोण मुरली वाजयिता.
लाडको बंधू माझो,
जने गाईला बोलविता ।१९।
नदीचे पयलाडी,
कोण बाबडो झाडा मोडी.
लाडको बंधू माझो,
गवळी वाडो कुडी. ।२०।
देवाच्या देऊळात,
शोभा बैसली घनदाट.
लाडक्या बंधू माझ्या,
अठ गोईंदा विडे वाट. ।२१।
भाऊ नि गे बोलवी
'भैनी जेऊया दहीभात.
भावजय काई बोले,
दही ओतिला गाईरीत. ।२२।
भाऊ नि गे बोलवी,
'भैनी, ये गे तू आदर्याला'
भावजय काय बोले,
'ननान नको ती शेजार्याला' ।२३।
भाऊ नि गे बोलणी
'भैनी, ये गे तू तैल घाल'
भावजय काई बोले
'तैल नाही दबीयेत.' ।२४।
भाऊ नि गे बोलवी
'भैनी, ये गे तू कॅंस उगय
भावजय काई बोले
'फनी हेली ती उंदरान' ।२५।
भाई नि गे बोलवी,
'भैनी ये गे तु फुला माळ'
भावजय काई बोले,
'फुल झाली ती खुप म्हाग ।२६।
आम्याची गे आमाडी,
जलदी कोण पाडी.
लाडको बंधू माझो,
चलताना इस्ट जोडी ।२७।
तबल्या हात मारी,
मारीता केवा मेवा.
लाडको बंधू माझो,
नाटकी गेलो गावा ।२८।
जोड्यांचे पाये,
लागेल उभे न्हये.
सुगंधी तान्ही बाई माझी
घामेन तोंड धुई ।२९।
जोड्यांचे पाय,
पडले सरवलात.
सुगंधी तान्ही माझी
नांदते गोकुळात ।३०।