भरली चंद्रभागा
गुणो बुडलो न्हान थोर
लाखाचा पितांबर
जनी धुईता पायावर ।१।
धुईता गे पिळीता
तुटलो चंद्रहार
दयाळ पांडुरंग
मोती वेचिता शेल्यावर ।२।
पंढरे गे जाऊची,
तयारी केली काल
देवाच्या विठ्ठ्लानी
साधु संताना दिली चाल ।३।
पंढरे गे जाऊची
तयारी केली होती
तयारी केली होती
पूढे लागले गणपती ।४।
पंढरे गे जाताना
पाया लागले खडे
देवाच्या विठ्ठलानी
पूढे धाडीले हत्तीघोडे ।५।
पंढरे गे जाताना
वाटे गाऊलो करमळ
देवाच्या विठ्ठलांनी
भेट घेऊया निरमळ ।६।
पंढरे गे जाताना
वाटे गाऊल्या उभ्या मेरा
विठ्ठल नाही घरा
रुक्मीण बाईचे पाय धरां. ।७।
पंढरे पुरामधी
रुक्मीण बैसली ,न्हायाला
पाणी नाही विसाण्याला
सत्वाच्या पांडुरंगा
झरा फोड रे पाषाणाला ।८।
झरा फुटला पाषाणाला
तुझ्या सत्वाच्या झाल्या गंगा
पुरे पुरे रे पांडुरंगा ।९।
पंढरे पुरामधी
मेली ती एक गाय
सत्वाची रुक्मीणीबाई
चोख्या म्हाराला साद देई
चोरकांनी म्हार म्हणे
मी एकटा करू काई ।१०।
पंढरे जाता तेली
मात्या पित्याच्या गळा दोरी
अस्तरी खानावरी
मुरली पंढरी झाली दूर` ।११।
विठ्ठलाच्या नि गे पायी
रुक्मीण लाई लोणी
'सत्य मेला स्वामी
जनी तुमची कोण ? '
वेडे खुळे रुक्मीणी
बालपणाची मैतरीण ।१२।
सातेरी गे नेसली
लाखाचा पितांबर,
कमार मुदीभर
मीरयां कांढील्या हजारभर ।१३।
देऊकी बाई तुझो
किरीणा अतिनष्ट.
पोबुळे तळेवरी,
तेनी घागरी केल्या घर
देअकी काय बोले,
'माझो किरीष्णा पाळण्यात ।१४।
देऊकी बाई तुझो
किरीष्णा बरमचारी
साठ तिनशे गोपिका
त्याने भोगुन आलो घरी ।१५।
देऊके गे बाई,
तुझ्या किरीष्णा दाखय भय
'बोलती सासुबाई,
घरी जाऊन सांगू काय ? ।१६।
पाणीया जाते नारी
तुझी घागर दाये कुशी
किरीष्णा वयले येशी
चेंडू मारिला घागरेशी```` ।१७।
पुस्तकाची पटी
पटी वाचिता श्रीराम
मस्तकी आला घाम
सीता पुसीता पदरान ।१८।
पंढरे जाऊचाअ म्न
मींया तयारी नाही केली
माता पिता पुढे गेली
माझ्या तिर्थाची सोय झाली ।१९।
पंढरे जाऊचा मन
मींया तयारी केली होती
रुक्मीणीच्या गे पती
माझ्या सपनी आला राती ।२०।