दुर्बळ संवसार
हंसती गावोगाव
चिदंबर देऊ स्वामी
माझी दया ही तुला येऊ ।४१।
माझ्या नि वांगडनी
दिल्या त्या देशोदेशी
कार्तिकी एकादशी
आमी मिळुया पंढरेशी ।४२।
फातोडी पार झाला
कोंबडा फडफडी .
सूर्य नारायण
आपल्या रथाला बाण जोडी. ।४३।
सकाळी उठो नियां
सत्य ह्यां बोल जिभे
सुर्यनारायण,
अंतराळी देव उभे ।४४।
सकाळी उठोनिया
राम राम गे माझे मुखी
देवा तू नारायणा
सर्व मंडळी राख सुखी ।४५।
देगा तू देगा देवा
आंग भरोनिया काम
गॉटो भरोनिया शेण
माझ्या कुडीचां घुसळण ।४६।
दोन्याराच्या निगे भारा
गोसावी आले भिके
धरम वाढ सीते,
शिजलेल्या गे अन्नाचो
मूठ्भर दान्याचो
सीते नारीचो धरम मोठो ।४७।
उगवलो सूर्य देव
पिर्भूमेंचा गे राजा
सूर्य नारायण
नमस्कार नि गे माझा ।४८।
उगवलो सूर्यदेव
गुण्याच्या कपेरीत
सूर्य नारायण
विष्णूचे कचेरीत ।४९।
सीता नि जनमली
लंकेला आला काळ
दशरथा घरी बाळ
सीते नारीचा भरतार ।५०।
कैकयीचो गे पिंड
धारीन गे नेलो
अंजनीचे पोटी
मारुती जनमलो. ।५१।
उडान जाई पक्षी,
पाखां लागेता गगनावरी
सीतेच्या स्वयंवरी
राम जाता गे ललनाशी ।५२।
रामाची नि गे सीता
लक्ष्मणा तुझी व्हनी
चोरुन नेली कोणी
लंकेच्या रावणानी ।५३।
पालन केला कोणी
वनीच्या पकशांनी
शोध लावला कोणी
रामाच्या शेवकानी ।५४।
सीतेला वनवास
वनात तिची न्हाणी
पुण्याच्या तातोबानी
नेत्र झाकून घाली पाणी. ।५५।
भरली भिवरीबाई
गुणो बुड्लो न्हान थोर
लक्षाचा पितांबर
जनी धुईता पायावर ।५६।
रुक्मीणी विचारीता
शेला कैशाने ओला झाला ?
वेडे रुक्मीणी
माझ्या मस्तकी घाम आला. ।५७।
राम नि लक्ष्मण
दोघे गळीचे नि गे हार
कैकयी नार म्हणे
सीता पुतळी मजेवार ।५८।
पंढरे गे जाताना
पाया लागती काळी माती
देव त्या विठ्ठ्लाची
भेट घेऊया पारेराती ।५९।
देवात देव थोर
सत्यनारायण देऊ थोर
त्याच्या गे पुजयेक
तुळशी हाडील्या हजारभर ।६०।