संदर्भ - भाऊ बहिण ५

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


भाऊ बहिण

सांगान मिंया धाडी

माझा सांगान अगतियां

लाडक्या बंधू माझ्या

ताट निवला पंगतीचां ।६१।

सागान मींया धाडी

माझा गांगणा वारंवार

लाकडो बंधू माझो

कोठे गुंतलो चंद्र्हार ।६२।

भाऊ आला मुंबयवाला

भैणी आल्या भेटायला

भावजय काई बोले

नंद्यो आल्या भेटायला ।६३।

जीवनी माझो गेलो

बंधू कळलां जेईताना

लाडको बंधू माझो

शिरी सुकलो धावताना ।६४।

वाटेनी वयला घर

शिवला साळकांनी

लाडक्या बंधू माझ्या

घर शोभला बाळकांनी ।६५।

तिनानी सानू झालो

दिवो लाई मी लामणीचा

बहिणी बाई माझे

बाळ खेळता बामणीचो ।६६।

तिनानी सानू झालो

दिवो लावी मी गवनीला

लाडक्या बंधू माझ्या

नंदी आला रे दावनीला ।६७।

तिनानी सानू झाल्यो

लक्ष्मी येता झाली

लाडक्या बंधू माझ्या

शेल्याची घोटी केली ।६८।

येईल गे लक्ष्मी,

वटांगली सारनी

वडील भावजय

मानावली गे घरनी ।६९।

येईली गे लक्ष्मी

शेताच्या शेअकडे

लाडको बंधू माझो

हाती गोपीन पाया पडे ।७०।

दारीच्या गे तुळशी

वाटोळी तुझी पानां

पिरतीची दोघाजणां

तुळशी काढीती परदक्षणा ।७१।

बहिणी हाडू जात्या

वाटेक तुझी शोभा.

लोकांच्या दारी उभा

बंधू माघारी परतला. ।७२।

खानावैला शेला

बंधू दुखानी भिजयीला.

माऊली विचारी,

बाळा शेला रे कैसा ओला ?

'बहिणीच्या गावलागी

माते पाऊस वरसला' ।७३।

भाऊ नसलेले बहिणी,

तुझा माहेर सणासूणी

भाऊ असलेले बहिणी

तुझा माहेर चिरेबंदी. ।७४।

दोघीचा मैतरपण,

मैतरपणाला काय देऊ ?

बंधून दिली चोळी

एका धुन्याला दोघी लेवू. ।७५।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:18:59.8730000