पाणी पाणी म्हणान
सुकलो माझो देही
अमृतासारखे न्हयी
शंकरान घातिल्या परतुनी ।१३६।
चंद्रभागेचा पाणी
चलता अहंकारानी
भोळ्या शंकरानी
नदी घातिल्या परतोनी ।१३७।
सीतेला वनवास
केगी देईना गे फनी
बारा नि वर्सा झाली
सीतेन सोडीली पाठीर ईनी ।१३८।
सीतेला वनवास
केगी देईना गे थाळी
वनात तिची न्हानी
सीता कंटेन न्हाली पानी ।१३९।
सीतेला वनवास
केगी देईना गे तेल
बारा वर्सा झाली
सीते नारीचे झाले खैल ।१४०।
साखरेचा पाणी
काचीच्या गलासात
मुंबयच्या ऑफिसात
बंधू माझो तो लिनेदार ।१४१।
साखरेचो लाडू
तुपाच्या संगतीचो
लाडको माझो बंधू
थोराच्या पंगतीचो ।१४२।
आंगाक गे आंगल
खिशात हिरवो खन
लाडक्या बंधू माझ्या
येदे पिरतीची तुझी कोण ? ।१४३।
साखळे शेरा मधी
नऊ लाखाचो खुर्दो केलो
पैशाच्या पिंजरसाठी
भयनी बाजार उलगलो. ।१४४।
जायेच्या झाडाखाली
कोण निजलो मुशफिर
त्याच्या नि मस्तकावर
जायो गळती थंडगार. ।१४५।
दारातलो माड
शेलींची झालो जड
राजा नि माझो बाप
पुत्रांनी दिसे थोर. ।१४६।
देवाच्या देऊळात
विठ्ठल काळेकिट
रुक्मीणी गोरीपीठ
बघा बायानी जोडा निट ।१४७।
बासरां वांयीच्या
पॉनान कृसलां
चाडीया गे मानुस
वसरे गे पासला ।१४८।
रामाचे माळ्येवरी
सीता नार ही उपवट
सीतेला न्हान आला
रामदेवाला कसा कळला ? ।१४९।
तुळशिचे पेडयेवरी
सात समई दिवा जळे
सीतेच्या बाजयेवरी
रामदेवाची फेरी झाली
खानावरचा शेला मारुन
सीते बाईला जागी केली. ।१५०।