संदर्भ - इतर ८

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


गुरुबापाच्या मठार

जुत्याची झाली दाटी

गुरु नि जे बापाचो

भणारो झालो राती. ।१०६।

गुरुबापाच्या नि गे मठा

सोन्याच्या नि गे विटा

सदगुरु गे गोमटा

पलंगी पहुडला ।१०७।

दैवाची नि गे नार

नशीबा झाली खोटी

अक्षर लिही सटी

ब्रम्हा तातडी झाली मोठी ।१०८।

गर्वाची नि गे नार

चालती उतानी

बुडी बघ पापानी

रस्तो गुंतलो काटयानी ।१०९।

शेजयेचे ग दारावरी

जाऊ नये वारंवारी

शेजयेला गर्व भारी

दाया पायान पाट सारी ।११०।

शेजारनी गे बाई

येऊ नको तू दोनदा तिनदा

लागलय तुझ्या छंदा

मज सुचेना कामधंदा ।१११।

माझ्या नि वांगडनी

ईसात एक कमी

कुकमाच्यो गोनी आमी

खुडूया सार्‍या जणी ।११२।

दळाप मींया दळी

सांडग्या पापडाचा

सदगुरु म्हाराजांचा

येणा झाला तातडीचा ।११३।

सासर्‍या जाई लेक

जमल्या आया बाया

पाहू गेला भाऊराया

मागे परतल्या भावजया. ।११४।

भरल्या बाजारात

माझ्या मायेचो नाही कोण

तोंडाच्या गोडयेन

मींया जोडीली माय बहिण ।११५।

सळीच्या तांदळाची

वाळण दोन्यावरी

वडील भावजय

कांता रुसली भान्यावरी ।११६।

सरला माझा दळप

माझ्या सुपात पाच पाऊं

देवाने दिले भाऊ

आमी बहिणी गीत गाऊं ।११७।

सरला माझा दळप

माझ्या सुपात पाच वोशे

भावात बहिण बसे

मध्ये सोन्याची रास दिसे ।११८।

सरलां माझा दळप

सरला म्हणा नये

चवथीचे गे तये

चंद्रमा बंधू नये ।११९।

सरला माझा दळप

सरला कांग काजूळ

रामच्या पलंगावर

सीता बोलती मंजूळ ।१२०।

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP