संदर्भ - भाऊ बहिण ६
पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
चाकर्या असत्या बंधू,
तुझी चाकरी खुंयच्या खंडा ?
नेणती भावजय
बांधिली तुझ्या देडा ।७६।
वाडीचा कलावत
माका म्हणता व्हनीबाई
लाडक्या बंधू माझ्या
तुझा त्याचा रे नातां काई ? ।७७।
बारा नि बईलाची
रवळ्यार मळणी
लाडको बंधू माझो
सोना घालीता गे चाळणी ।७८।
गांईचे गोठणीर,
कोण मुरली वाजईता
लाड्को बंधू माझो
सोना घालीता गे चाळणी.
गाईचे गोठणीर,
कोण मुरली वाजईता
लाडको बंधू माझो,
जने गाईला बोलविता ।७९।
लामनी माझे केस
मातेने वाढविले
तेलाचे नि डबे
माझ्या पित्यान पुरयिले,
आमाड्या भोवती गौणो
माझ्या बंधून शोभियिलो ।८०।
खाऊच्या पानासाठी
शेजी पडली माझ्या गळा
लाडक्या बंधू माझ्या
चल जाऊया पानमळया ।८१।
भरल्या बाजारात
केदवळ मींया उभी.
लाडको बंधू माझो
चोळ्ये रंग शोधी. ।८२।
वाटेचा वाट सुरु
ईच्यारी माझा घर
हातात पोईतर,
बंधू माझ्या तो मईतर. ।८३।
साळीच्या तांदळाचा
शिजान झाला मेंन.
लाडक्या बंधू माझ्या
तुझ्या गजाली गेला ध्यान ।८४।
भरताराची खूणा
अस्तरी त्याची जाणा
वटडील भावजय
हाती चुनाळ मूठी पाना ।८५।
वडील भाऊजयी
तिचा बोलणा अहंकाराचा
नेणतो बंधू माझो
राजीया शंकराचा ।८६।
सान सरग्याची
नथ पडली गालावरी
वडील भावजय
राणी धुळीता भानावरी ।८७।
फातोड पार झाली
कोगूळ बसली मेजा
लाडक्या बंधू माझ्या
शुभ शकुन झालो राजा ।८८।
तिनानी सानू झाल्या
तिन खेळाच्या तीन येळा
नेणत्या तान्ह्या बाळा
बीद सोडुन दारी खेळा. ।८९।
तिनानी सानू झाल्या
बाहेर माझे चित्त
नेणता तान्हा बाळ
दारी खेळता रघुनाथ ।९०।
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018

TOP