संदर्भ - इतर ११
पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
रामचंद्र ही काई बोले
इगडी आमची आई
बारा नि वर्सा झाली
सीता मिळेना आमच्या हाती ।१५१।
सासर्यांचा गे देऊ
चालेता झटाझटी
देव माझ्या माहेरीचो
ऊभा राही गे माझ्यासाठी ।१५२।
माहेरीचे नि गे
दिसती राईसक
बहिणी बाई माझे
माझी निवली तान भूक ।१५३।
बापान काही धाडीली
बुगडेची गे जोडी
उघडून बघल्यावर
लाडवाची पूडी ।१५४।
माऊळ्या निरे मामा
मारग लाईनिचो
लाडको बंधू माझो
गाव शोधिता बहिणीचो ।१५५।
फातोड पार झालो
जीव माझो गे भयभीत
माहेरीचो नि गे देव
विणो गे वाजयीत ।१५६।
सरला माझा दळप
सरला सरवांचा
महिर धरमांचा
माझा सासर जलमांचा. ।१५७।
दरीयाचे नि गे याळे
कबुतरां पाणी पिती
खानापुरची काळी माती
लोक मला विचारीती. ।१५८।
माहेरीचो माझो देव
रहिता रे एकुलो
मोतीयां पिकलो
सातेरी बाईच्या देऊळात ।१५९।
मोतीयांचो रे तुरो
बंधू सदा तू नको लांवू
निंदती तुझो गांव
उभे येशिन नको जावू ।१६०।
तो बघ नि कोण येता
तामीले तोपीयेचो
लाडको बंधू माझो
मराठी कारकून ।१६१।
चंदनाचा गे पाठ
तिरक्स कांतू नये
अन्याया वाचोनी
अस्तरे जांचू नये. ।१६२।
भरताराची गे सेवा
नको करु तू दुबवांन
सोरगीचे गे वाटे
झडती घेई तो नारायण. ।१६३।
आबोळेचा गे आबोला
माळूंचा सेवेसाठी
जायेची उतरां मोठी
घेऊची दिरासाठी ।१६४।
चला गे बघू जाऊ
सातेरी बाईची साटो सुटो
त्यातही माझो वाटो
काजाळ कुकमाचो ।१६५।
N/A
References : N/A
Last Updated : January 11, 2008

TOP