सोन्याचा शेजफूल,
रुप्याच्या पाकिटात
लाडको बंधू माझी,
दत्तात्रयाच्या नाटकात ।३१।
आई बापाच्या गे जीवा,
मीया वाढल्य जीवाशी.
दिल्या गे घराशी
मीया पडलूय दुरवाशी ।३२।
बापान दिली लेक,
आपला साया केला
माटवाच्या नि गे दारी
हाती धरून दाया दिला ।३३।
भावान दिली चोळी,
भावजय डोळे मोढी,
नको रे तुझी चोळी,
तुझ्या शब्दाची मला गोडी ।३४।
भावान दिली चोळी
भावजय देईना सुय दौरो
पाठीचा बंधू खरो
मीया बघीन तुझो तोरो ।३५।
भाऊनि गे आपलो,
भावजय लोकांची.
जानीया गोनावली
सरपोळी गोपाची. । ३६।
शिकारी जात्या बंधू,
तुझी शिकार किती दूर
बंधुच्य़ा खानावर,
शिंगाडया रे तुझा शिर ।३७।
शिकार्या जात्या बंधू,
नको मारु त्या हरीणीला.
पिलाच्या मरणीला,
माझ्या गळीची आन तुला. ।३८।
चाकरे जात्या बंधू,
तुझी चाकर शरतीची
अस्तरी पिरतीची,
रजा घेरे महिन्याची. ।३९।
दिवस माऊळ्लो
कनेरनी खाली गेलो
लाडक्या बंधू माझ्या
जोता सोणूचो वेळ झालो. ।४०।
दिवस माऊळलो
बांद्या वाडीच्या तळवटी,
शाईची पूडी,
बंधु तुझ्या रे कनवटी ।४१।
साऊली परतली,
दारीच्या हसनाची
वाट मींया बघी
माझ्या पाठीच्या रतनाची ।४२।
साऊली परतली,
पर्वत डोंगराची
वाट नि मींया बघी,
माझ्या पाठीच्या रतनाची ।४३।
माझ्या नि पोरसात,
फुलली दाणी रोज.
लाडको बंधू माझो
आपल्या मावाडया मारी मौज ।४४।
पाऊस नि गे लागे
लागेता हडेतडे
बंधूच्या गावाकडे
थूंय पिकले वेलदोडे. ।४५।