एक पारधी बंदूक खांद्यावर टाकून व आपला म्हातारा कुत्रा बरोबर घेऊन शेताच्या बाजूने फिरत होता. त्या वेळी त्याला एका ठिकाणी एक तित्तर पक्षी व एक कवड्यांचा कळप दिसला. अशा वेळी कुठल्या पक्ष्यावर नेम धरावा याचा निश्चय त्याला करता येईना, म्हणून त्याने दोहोंच्यामध्ये नेम धरून गोळी उडवली, पण त्यामुळे एकही पक्षी त्याला मिळाला नाही. ते पाहून तो म्हातारा कुत्रा आपल्या मालकाला म्हणाला, 'अरे, एकाच वेळी दोन वस्तूंवर नेम धरणं केव्हाही शक्य नाही. तू दोघांच्यामध्ये नेम न धरता कोणत्यातरी एक पक्ष्यावर नेम धरला असता तर तुला एक तरी पक्षी नक्की मिळाला असता.'
तात्पर्य - दोन वस्तू एकदम मिळविण्याची हाव धरली असता, बर्याच वेळा एकही वस्तू मिळत नाही.