एक लहान तोंड असलेल्या भांड्यात काही बोरे ठेवलेली होती. ती काढण्यासाठी म्हणून एका मुलाने त्यात हात घातला. त्यावेळी त्याला हातात बरीच बोरे घेता आली, पण बोरामुळे हात बाहेर काढता येईना.
हातातील इतकी बोरे सोडण्याचे त्याच्या जीवावर आले. मग तो आपला हात तसाच भांड्यात ठेवून मोठमोठ्याने रडून आपल्या नशिबास दोष देऊ लागला.
त्यावेळी एक माणूस जवळच उभा होता. तो हा सर्व प्रकार पाहून त्या मुलास म्हणाला, 'मुला तू आपल्या मुठीत जी बोरं घेतली आहेस त्यातली निम्मी बोरं टाकून दे. म्हणजे तुला हात बाहेर काढता येईल.'
तात्पर्य - कोणतीही वस्तू आपणास सहज मिळाली तरी ती एकदम खाऊन टाकण्याचा प्रयत्न करू नये.