एका पर्वताखाली मेंढ्यांचा कळप चरता असता पर्वतावर असलेल्या एका गरुड पक्ष्याने त्या कळपावर झेप घातली व त्यातील एका मेंढ्याच्या पाठीवर बसून त्याला आपल्या पायात धरून तो आकाशात गेला. ते पाहून जवळच्या झाडावर बसलेला कावळा तसेच करायला गेला व त्याचे पाय मेंढ्याच्या लोकरीत अडकले. तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून धनगर तेथे आला व त्याने त्या कावळ्याला पकडून त्याच्या पायाला दोरी बांधली व तो आपल्या मुलाला खेळायला दिला.
तात्पर्य - दुसर्याचं अनुकरण करताना आपली स्थिती व शक्ती यांचा विचार करावा.