कोंबडा व घोडा

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


कोंबडा व घोडा

एक कोंबडा एका तबेल्यात शिरला व तेथे बांधलेल्या घोड्यांच्या शेजारी जो कडबा पडला होता तो उकरू लागला.

घोडे आपले मागील पाय वरचेवर झाडतात व जमिनीवर आपटतात. ते पाहून त्यांची कान उघाडणी करण्यासाठी तो कोंबडा मोठ्या गंभीरपणे घोड्याला सांगू लागला, 'अरे, तुमचं हे वागणं बरोबर नाही. आपण एकमेकांच्या पायांनी एकमेकांना तुडवू नये, यासाठी आपण शक्य ती काळजी घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा.'

तात्पर्य - स्वतःची किंमत किती हे लक्षात न घेता जो मोठेपणाच्या नात्याने बोलू लागतो तो मूर्ख होय.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T18:51:49.5330000