मज्जवहस्त्रोतस - शिरोभिघात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
शिरस्यभिहते मन्यास्तम्भार्दितचक्षुर्विभ्रममोहोद्वेष्टनचेष्टा-
नाश कासश्वास हनुग्रह मूकगद्गदत्वाक्षिनिमीलनगंडस्पं-
दनजृंभण लालास्त्रावस्वहानिवदनजिह्नत्वादीनि; ।
च. सि. ९-६ पान १७२०
शिराचा अभिघात झाला असतां मन्यास्तंभ अर्दित, चेष्टानाश, (शाखावध). हनुग्रह, तोंड वाकडे होणे असें वातव्याधी, डोळे तारवटणें, शरीर आवळल्यासारखे वाटणें, कास, श्वास, बोलणे बंद होणें, आवाज गद् गद् होणे, डोळेमिटणे, कानशिलावरील शिरा उडणे, जांभया येणे, लाळ सुटणे स्वरभेद अशी लक्षणें होतात. शिरोभिघात केवळ आगंतू कारणानेंच होतो असे नाही दोष प्रकोप या निज कारणानेंही होते, म्हणून चरकानें तीनही मर्माचे रक्षण करतांना ``तस्मात् एतानि विशेषेण रक्ष्याणि, बाह्याभिघातात्'' असे स्पष्ट विधान केले आहे. मज्जवह स्त्रोतसांतील रोगाचे शिरोभिघात हे एक सामान्य कारण मानावे असे आम्हास वाटते. उल्लेखिलेल्या लक्षणांचा विचार करता हा स्वतंत्र रोग मानणे थोडे कठीण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP