``लिंगं पित्तावृत्ते दाहस्तृष्णा शूलं भ्रमस्तम: ॥६१॥
कट्वम्ललवणोष्णैश्च विदाह: शीतकामिता ।
शैत्यगौरवशूलानिकट्वाद्युपशयोऽधिकम् ॥
लड्घनायासरुक्षोष्णकीमता च कफावृत्ते ॥६२॥
च. चि. २८/६१-६२ पान १४५२-५३
वायु पित्तानें आवृत झाला असतांना दाह, तृष्णा, शूल, भ्रम, तम, शीतप्रियता, कटु, आम्ल, लवण यांच्या सेवनानें विदाह होणें अशीं लक्षणें होतात. वात हा कफानें आवृत झाला असतांना शीतता, गुरुता, शूल, लंघन, श्रम, रुक्ष, उष्ण हवेंसें वाटणें, कटु, आम्ल, लवण, यांच्या उपयोगानें बरें वाटणें अशीं लक्षणें होतात.
`मारुतानां हि पञ्चानामन्योन्यावरणे श्रृणु ॥
लिड्गं व्याससमासाभ्यामुच्यमानं मयाऽनघ ।
प्राणो वृणोत्युदानादीन् प्राणं वृण्वन्ति तेऽपि च ॥
उदानाद्यास्तथाऽन्योन्यं सर्व एव यथा क्रमम् ।
विंशतिर्वरणान्येतान्युल्बणाणां परस्परम् ॥
मारुतानां हि पचानां तानि सम्यक् प्रतर्कयेत् ।
सर्वेन्द्रियाणां शून्यत्वं ज्ञात्वा स्मृतिबलक्षयम् ।
व्याने प्राणावृते लिड्गं कर्म तत्रोर्ध्वजत्रुकम् ।
स्वेदोऽत्यर्थं लोमहर्षस्त्वग्दोष: सुप्तगात्रता
प्राणे व्यानावृते तत्र स्नेहयुक्तं विरेचनम् ।
प्राणावृते समाने स्युर्जडगद्गमूकता: ॥२०४॥
चतुष्प्रयोगा: शस्यन्ते स्नेहास्तत्र संयापना: ।
समानेनावृतेऽपाने ग्रहणी पार्श्वहृद्गदा: ॥३०५॥
शूलं चामाशये तत्र दीपनं सर्पिरिष्यते ॥३०६॥
मारुतानामन्योन्यावरणमाह - मारुतानामित्यादि यद्यपि चेह
वायोरमूर्तत्वं वातकलाकलीये प्रोक्तं, तयाऽपीदममूर्तत्वम्
कठिनवाचकं न त्वयवप्रतिषेधकं; दृष्टवा च वायुना
वाय्वन्तरेणो ॥
हतेन वातकुण्डलिता बहिरपि, तेनोपपन्नमावरणं वातानां
परस्परम् ।
प्राणो वृणोत्युदानादीनित्यनेन चत्वार्यावरणानि,
प्राणं वृण्वन्ति तेऽपि चेत्यनेन च चंत्वारि, उदाना-
द्यास्तथाऽन्योन्यमित्यनेन, द्वादशावरणान्युच्यन्ते ।
तत्रोदानेन व्यानादीनां त्रयाणामावरणे त्रीणि, तथा व्यानाधैश्चो-
दानावरणे त्रीणि, तथा व्यानेन समानापानावरणे द्वे ,
ताभ्यां च व्यानावरणे द्वे, परिशिष्टयोञ्चान्योन्यावरणे द्वे,
एवं द्वादशावरणानि पूर्वाष्टकयुक्तानि विंशतिर्भवन्ति ।
उल्बणानामिति वृद्धानां किंवा उत्बणानामिति आविष्कृत-
तमानां मिलितानां पञ्चानां; तेनैतेषामेकद्विव्यादि संसर्गे-
णावार्यावरकतया भेदाद्वहुविधमावरणं भवतीति दर्शयति ॥
च. चि. २८-१९९-२०६ च. पा. टीकासह पान १४७१-१४७२
प्राण, उदान, व्यान, समान, अपान, हे पांच वायु परस्परांना आवरण करुन २० प्रकारचे आवृत वात उत्पन्न करतात.
१) व्यान हा प्राणानें आवृत झाला असतां सर्व इंद्रियांना शून्यत्व येतें. स्मृति व बल यांचा क्षय होतो.
२) प्राण व्यानानें आवृत झाला असतां घाम फार येतो. अंगावर रोमांच उभे रहातात. त्वचा दुष्ट होते. अवयवांना बधिरता येते. सुप्तता येते.
३) समान हा प्राणावृत झाला असतां बुद्धि मंद होते. बोलतां येत नाहीं. बोलणें घोगरे अडखळत होतें.
४) अपान समानानें आवृत झाला असतां पार्श्वशूल, हृद्रोग, ग्रहणी या व्याधीसारखीं लक्षणें होतात. आमाशयांत शूल होतो.
शिरोग्रह: प्रतिश्यायो नि:श्वासोच्छ्वास संग्रह: ॥१०६॥
हृद्रोगो मुखशोषश्चप्युदाने प्राणसंवृते ।
तत्रोर्ध्वभागिकं कर्म कार्यमाश्वासनं तथा ॥२०७॥
कर्मोजो बलवर्णाना नाशो मृत्युरथापि वा ।
उदानेवृते प्राणे तं शनै: शीतवारिणा ॥२०८॥
सिश्चेदाश्वसयेच्चैनं सुखं चैवोपपादयेत् ।
उर्ध्वगेनावृतेऽपाने छर्दिश्वासादयो गदा: ॥२०९॥
स्युर्वाते अत्र बस्त्यादि भोज्यं चैवानुलोमनम् ।
मोहोऽल्पोऽग्निरतीसार उर्ध्वगेऽपान संवृते ॥२१०॥
वाते स्याद्वमनं तत्र दीपनं ग्राहि लाद्यवम् ।
वम्याध्मानमुदावर्त गुल्मार्तिपरिकर्तिका: ॥२११॥
लिड्गं व्यानावृतेऽपाने तं स्निग्धैरनुलोमयत्त् ।
अपानेनावृते व्याने भवेद्विण्मूत्ररेतसाम् ॥२१२॥
अतिप्रवृत्तिस्तत्रापि सर्वं संग्रहणं मतम् ।
मूर्च्छा तन्द्रा प्रलापोऽड्गसादोन्योजबलक्षय: ॥२१३॥
समानेनावृते व्याने व्यायामो लघु भोजनम् ।
स्तब्धताऽल्पाग्निताऽस्वेदश्चेष्टाहानिर्निमीलनम् ॥२१४॥
उदानेनावृते व्याने तत्र पथ्यं मितं लघु ।
पञ्चान्योन्यावृतानेवं वातान् बुध्येत लक्षणै: ॥२१५॥
एषां स्वकर्मणां हानिर्वृद्धिर्वाऽऽऽवरणे मता ।
यथास्थूलं समुद्दिष्टमेतदावरणेऽष्टकम् ॥२१६॥
सलिड्गभेषजं सम्यग्बुधानां बुद्धिवृद्धये ।
च. पा. टीकेसह च. चि. २८-२०७ ते २१७ पा. १४७३,७४
टीका -
शिरोग्रह इत्यादिना अष्टावावरणानि प्रायो भावीनि अनुक्त-
शेषोपग्रहणार्थमाह । उर्ध्वभागिकं कर्मेति उपर्युक्त स्नेह-
पाननस्यादिकम् । श्वासादय इति श्वासहिक्कादय: ।
उर्ध्वगेनेति उदानेन । अनुक्तज्ञानार्थमावरणस्वरुपमाह-
एषां स्वकर्मणा मित्यादि । अत्र अवार्याणां बलीयसाऽऽ-
वरणात् स्वकर्महानिर्भवति, आवकरस्य तूत्सर्गत: स्वकर्म
वृद्धिर्भवति, तथा आवरणेन च आवार्य: प्रकुपितो भवति
तदा स्वकर्मणां वृद्धिर्भवतीति व्यवस्था; अन्ये तु आवरणी-
यस्य स्वकर्महानि:, आवरकस्य तूत्सर्गतो वृद्धिर्भवतीति
व्यवस्थामाहु: ॥२०६॥२१६॥
च. चि. २८/१०६ ते १६ पा. १४७३/७४ सटीक
५) उदान प्राणानें आवृत झाला असतां डोकें जखडल्यासारखें होतें. पडसें येतें, श्वासोच्छ्वासास अडथळा होतो. हृद्रोगासारखीं लक्षणें होतात. तोंड कोरडें पडतें.
६) प्राण उदानानें आवृत झाला असतां ओज, बल, वर्ण, आणि शरीराचीं इतर कर्मे यांचा नाश होतो व मरण ओढवतें.
७) अपान उदानानें आवृत झाला असतांना ओकारी होणें, श्वास लागणें, उचकी येणें, खोकला होणें अशीं लक्षणें होतात.
८) उदान अपानाने आवृत झाला असतां मोह होतो, अग्निमंद होतो व अतिसार होतो.
९) अपान व्यानानें आवृत झाला असतां छर्दी, आध्मान, उदावर्त, गुल्म, परिकर्तिका हीं लक्षणें होतात.
१०) व्यान अपानानें आवृत झाला असतां पुरीष, मूत्र व शुक्र यांची अतिप्रवृत्ती होते.
११) व्यान समानानें आवृत झाला असतां मूर्च्छा, तंद्रा, प्रलाप, अंगसाद, अग्निमांद्य, ओजक्षय, बलक्षय अशीं लक्षणें होतात.
१२) व्यान उदानानें आवृत झाला असतां अवयव स्तब्ध होणें, किंवा शरीराच्या क्रिया अडखळणें, अग्निमंद होणें, घाम न येणें, हालचाली मंदावणें, डोळे मिटून बसावेसें वाटणें अशीं लक्षणें होतात. संख्याक्रमानें होणार्या २० आवरणांपैकीं वर बारा आवृत वात उल्लेखलेले आहेत. प्राणावृत अपान, उदानावृत समान, समानावृत प्राण, समानावृत उदान, व्यानावृत उदान, व्यानावृत समान, अपानावृत प्राण आणि अपानावृत समान या आठ प्रकारच्या आवृत वातांचा उल्लेख चरकाच्या
चिकित्सास्थानांतील २८ व्या अध्यायांत येत नाहीं. कदाचित् हे ८ प्रकार क्वचित् घडत असल्यामुळे ग्रंथकारांनीं त्यांचा उल्लेख केलेला नसावा. उल्लेखलेल्या आवरनाच्या धोरणानें इतरही आवरणांचें ज्ञान करुन घ्यावें असें चरकानें सांगितलें आहे.
आवरणामध्यें त्या त्या वातप्रकाराच्या कर्माची हानि वा वृद्धि होते या चरकाच्या विधानावर भाष्य करीत असतांना आवरण घालणारा वायु बलवान् असून, जो आवृत होतो तो दुर्बल ठरल्यामुळें आवरण घालणार्या वायूच्या कर्माची हानि होते असें म्हटलें आहे. तसेंच जर आवरण घालणार्या वायूच्या कर्माची हानि होते असें म्हटलें आहे. तसेंच जर आवरण घालणार्या वायूनें उत्पन्न केलेल्या अवरोधानें आवृत वायु प्रकुपित झाला तर आवृत वायूच्या कर्माची वृद्धि होते असेंही टीकाकर सांगतो. आवृत वायूच्या कर्माची हानि व आवरण घालणार्या वायूच्या कर्माची वृद्धि नियमानें होतें असेंही एक मत चक्रदत्तानें उल्लेखलेलें आहे. आवृत वायूच्या प्रकरणीं उल्लेखलेल्या लक्षणांचा विचार करतां वृद्धि-हानि संबंधींचा कोणताही निश्चित नियम सांगता येत नाहीं त्यामुळें आवृत वायूचें हें प्रकरण गूढ राहिलेलें आहे. त्यामधील वस्तुस्थिति नेमकी काय असावी याचा बोध होत नाहीं.
मूर्च्छा दाहो भ्रम: शूलं विदाह: शीत कामिता ॥२२१॥
छर्दनं च विदग्धस्य प्राणे पित्तसमावृते ।
ष्ठीवनं क्षवथूद्गारानि:श्वासोच्छवास संग्रह: ॥२२२॥
प्राणे कफाकृते रुपाण्यरुचि श्छर्दिरेव च ।
मूर्च्छादीनि च रुपाणि दाहो नाभ्युरस: क्लम: ॥२२३॥
ओज भ्रंशश्च सादश्चाध्युदाने पित्त संवृते ।
आवृते श्लेष्मणोदाने वैवर्ण्य वाक्स्वरग्रह: ॥२२४॥
दौर्बल्यं गुरुगात्रत्वमरुचिश्चोपजायते ।
अतिस्वेदस्तृषा दाहो मूर्च्छा चारुचिरेव च ॥२२५॥
पित्तावृते समाने स्यादुपघातस्तथोष्मण: ।
अस्वेदो वह्निमान्द्यं च लोमहर्षस्तथैव च ॥२२६॥
कफावृते समाने स्त्याद्गाणां चातिशीतता ।
व्याने पित्तावृते तु स्याद्दाह: सर्वांग क्लम: ॥२२७॥
गात्रविक्षेपसड्गश्च ससंताप: सवेदन: ।
गुरुता सर्व गात्राणां सर्वसन्ध्यस्थिजा रुज: ॥२२८॥
व्याने कफावृते लिड्गं गतिसड्गस्तथाऽधिक: ।
हारिद्रमूत्रवर्चस्त्वं तापश्च गुदमेढ्यो: ॥२२९॥
लिड्गं पित्तावृतेऽपाने रजसश्चातिवर्तनम् ।
भिन्नामश्लेष्मसंसृष्टं गुरुवर्च: प्रवर्तनम् ॥२३०॥
श्लेष्मणा संवृतेऽपाने कफमेहस्य चागम: ।
च. चि. २८/२२२ ते २३१ सटीक. पा. १४७६
प्राणादीनां पित्तेन कफेन तथा पित्तकफाभ्यां चावरण-
लक्षणान्याह - मूर्च्छा दाहो भ्रम इत्यादि । मूर्च्छाद्यानि
मूर्च्छा दाह इत्यादिना प्रागुक्तानि । उपघातस्तथोष्मण
इति अत्र पित्तेनाप्यावृते समाने अग्न्युतेजनाभावा
दूष्मण उपघातो ज्ञेय: । गात्रविक्षेपसंग: गात्रविक्षे
पणोपरम: रजस । इति आर्तवस्य ॥२२१-३३०॥
प्राण कफावृत झाला असतां थुंकी येणें, ढेकर येणें, श्वासोच्छ्वास अडथळा येणें, तोंडाला चव नसणें व वांती होणे अशीं लक्षणें असतात साद तंद्रा अरुचि अशीं अधिक लक्षणें वाग्भटानें सांगितलीं आहेत. ( वा नि १६/४६) उदान पितावृत झाला असतां मूर्च्छा दाह, भ्रम, शूल, विदाह, शीतेच्छा, छर्दी, उरामध्यें कालवाकालव होणें, ओजाचा विस्त्रंस होणें, अंग गळून जाणें अशीं लक्षणें होतात.
उदान कफानें आवृतं झाला असतां विवर्णता, वाक्ग्रह, स्वरग्रह, दौर्बल्य, अंग जड होणें, अरुचि, अशीं लक्षणें होतात. समान कफावृत झाला असतां घाम न येणें, अग्निमांद्य, रोमहर्ष, शरीरगार पडणें अशीं लक्षणें होतात. व्यान पित्तावृत झाला असतां सर्वांगामध्यें दाह क्लम, गात्र-विक्षेप, गात्र संग, गात्र संताप (ज्वर), गात्र-वेदना अशी लक्षणे होतात. व्यान कफावृत झाला असतां सर्व शरीर जड होतें. सर्व सांधे व अस्थि दुखतात. व्यानाची गति मंद होते (नाडी व हृदय मंदावते). वाग्ग्रह आणि स्खलितगतित्व (अडखळत चालणें) ही लक्षणें वाग्भटानें अधिक सांगितलीं आहे.
(वानि १६,४७)
अपान पित्तावृत झाला असतां मूत्र-पुरीषांनां पिवळा वर्ण येतो गुदाची व मूत्र मार्गाची व योनीची (वा) आग होते (स्त्रियांमध्यें) रजस्त्राव अधिक होतो. अपान कफावृत झाला असतां, फुटीर, आमयुक्त, कफमिश्रित, गुरु अशी पुरीष प्रवृत्ती होते आणि कफजमेहाचीं लक्षणें दिसतात.
लक्षणाणां तु मिश्रत्वं पित्तस्य च कफस्य च ॥२३१॥
उपलक्ष्य भिषग्विद्वान् मिश्रमावरणं वदेत् ।
यद्यस्य वायोर्निर्दिष्टं स्थानं तत्रेतरौ स्थितौ ॥२३२॥
दोषौ बहुविधान् व्याधीन् दर्शयेतां यथानिजान् ।
आवृतं श्लेष्मपित्ताभ्यां प्राणं चोदानमेवच ॥३३३॥
गरीयस्त्वेन पश्यन्ति भिषज: शास्त्रचक्षुष: ।
विशेषाज्जीवितं प्राणे उदाने संश्रितं बलम् ॥२३४॥
स्यात्तयो: पीडनाद्धानिरायुषश्च बलस्य च ।
सर्वेऽप्येतेऽपरिज्ञाता: परिसंवत्सरास्तथा ॥२३५॥
उपेक्षणादसाध्या: स्युरथवा दुरुपक्रमा: ।
च. चि. २८/२३२ ते ३६
मिश्रमावरणमिति मिश्रितकफपित्तावरणम् । यथा
निजानिति यथात्मीयान् । गरीयस्त्वेनेति अधिकत्वेन
एतद्गीरीयस्त्वे हेतुमाह - विशेषादित्यादि । संश्रित-
मिति अधीनम् । अपरिज्ञाता इति याथातथ्येनाज्ञाता
सम्यग्ज्ञात अप्युपक्षेणाद्, याथातथ्येन ज्ञाता अपि परि-
संवत्सरास्तथेति योजनीयम् ॥२३१-२३५॥
पान १४७७
पित्तामुळें व कफामुळें उत्पन्न होणार्या आवरणाचीं लक्षणें संमिश्र स्वरुपांत दिसतील त्यावेळीं आवरणही संमिश्र (द्वंद्वज) असतें असें समजावें. ज्या ज्या वायूच्या स्थानामध्यें इतर दोन दोष (पित्त, कफ) जातात त्या त्या ठिकाणीं जणू स्वत:मुळें उत्पन्न होणारे अनेक प्रकारचे व्याधी उत्पन्न करतात. सर्व आवरणांपैकी प्राणाचे व उदानाचे पित्ताने वा कफानें होणारे आवरण अधिक गंभीर असते. प्राण हा जीवन आहे तर बळ हे उदानावर अवलंबून आहे. त्यामुळें प्राणोदानांचे पीडन होताच आयुष्य-नाश व बलहानि असें गंभीर स्वरुपाचे परिणाम होतात. सर्व प्रकारच्या आवृत वातांचें चांगलेसें ज्ञान झालें नाहीं, त्यांची उपेक्षा झाली, त्यांच्यावर योग्य ते उपचार केलें गेलें नाहींत किंवा आवृत वातास वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तर व्याधी असाध्य होतात.
हृदोगो विद्रधि: प्लीहा गुल्मोऽतीसार एव च ॥२३६॥
भवन्त्युपद्रवास्तेषामावृतानामुपेक्षणात् ।
तस्मादावरणं वैद्य: पवनस्योपलक्षयेत् ॥२३७॥
च. चि. २८/२३७, ३८ पा. १४७८
आवृत वातांच्या उपेक्षेने हृद्रोग, विद्रधि, प्लीहावृद्धी, गुल्म, अतिसार हे उपद्रव होतात.
चिकित्सा सूत्रें
केवलं निरुपस्तम्भमादौ स्नेहैरुपाचरेत् ॥७५॥
स्नेहश्च धातून्संशुष्कान् पुष्णात्याशु प्रयोजित: ॥८१॥
बलमग्निबलं पुष्टिं प्राणांश्चाप्यभिवर्धयेत् ।
असकृतं पुन: स्नेहै; स्वेदैश्चाप्युपपादयेत् ॥८२॥
तथा स्नेहमृदौ कोष्ठे न तिष्ठन्त्यनिलामया: ।
च. चि. २८/७५ पा. १४५४
निराम वायूवर रोग्याचे सात्म्य व वायूचें बलाबल यांचा विचार करुन चतुर्विध स्नेहापैकीं योग्य ते द्रव्य स्नेहनासाठीं वापरावें. चांगलें स्नेहन झाल्यानंतर इष्ट त्या प्रकारानें स्वेदन करावें. स्नेहनामुळें शुष्क झालेले धातु पुष्ट होतात, अग्नीचें व शरीराचें बल वाढतें. प्राणाचें रक्षण होतें. स्नेहानें मृदु झालेल्या कोष्ठामध्यें वातरोग राहूं शकत नाहींत. स्वेदनाने शरीरास मार्दव येऊन वायूचें अनुलोमन होतें.
यद्यनेन सदोषत्वात् कर्मणा न प्रशाम्यति ॥८३॥
मृदुभि: स्नेहसंयुक्तैरौषधैस्तं विशोधयेत् ।
च. चि. २८/८३ पान १४५४
दुर्बलो योऽविरेच्या: स्यात्तं निरुहैरुपाचरेत् ॥८६॥
पाचनैदर्पिनीयैर्वा भोजनैस्तद्युतैर्नरम् ।
संशुद्धस्योत्थिते चाग्नौ स्नेहस्वेदौ पुनर्हितौ ॥८७॥
स्वाद्वम्ललवनस्निग्धैराहारै: सततं पुन: ।
नावनैर्धूम्म्रपानैश्च सर्वा नेवोषपादयेत् ॥८८॥
इति सामान्यत: प्रोक्तं वातरोगचिकित्सितम् ।
च. चि. २८/८६ ते ८८ पा. १४५५
स्नेह स्वेदोपचारानंतरही दोष नाहीसे न झाल्यास स्नेहयुक्त मृदु विरेचन द्यावें, ज्याला विरेचन देणें शक्य नसेल अशा दुर्बल रुग्णास निरुह बस्ति द्यावा वा दीपन-पाचन औषधें आणि योग्य आहार द्यावा. शोधनानंतर अग्नि दीपन झालें म्हणजे पुन्हा स्वेदन करावें. मधुर अम्ल, लवण, स्निग्ध असा आहार वातरोग्यास द्यावा. सर्वच वातरोगामध्यें नस्य व धूम्रपान यांचा उपयोग करावा.
स्थानान्यवेक्ष वातानां वृद्धिं हानिं च कर्मणाम् ॥५५७॥
द्वादशावरणान्यन्यान्यभिक्षस्य भिषाग्जितम् ।
कुर्यादभ्यञ्जनस्नेहपानबस्त्यादिसर्वश: ॥२१८॥
क्रममुष्णमनुष्णं वा व्यत्यासादवचारयेत् ।
च. चि. २८ २१८,१९
उदानं योजये दूर्ध्वमपानं चानुलोमयेत् ॥११९॥
समानं शमयेश्चैव त्रिधा व्यानं तु योजयेत् ।
प्राणो रक्ष्यश्चतुर्भ्योऽपि स्थाने ह्यस्य स्थिति र्ध्रुवा ॥२२०॥
स्वं स्थानं गमयेदेवं वृतानेतान् विमार्गगान् ।
च. चि. २८/२२०, २२१ पा. १४७४, ७५
आवृत वातामध्यें वाताच्या स्थानांचा विचार करुन व वायूच्या कर्माची वृद्धि-हानि लक्षांत घेऊन अभ्यंजन, स्नेहपान, बस्ति, आणि उष्ण व अनुष्ण उपचारांचा व्यत्यास यथायोग्य रीतीनें करावा. उदानासाठीं वमन द्यावें, अपानासाठीं अनुलोमन द्यावें, समानासाठीं शमनोपचार करावे. व्यानावर वमन, अनुलोमन, शमन या तिन्ही क्रिया कराव्यात. प्राण दुष्टी असेल तर इतर चारही वायूंच्यापेक्षां क्वचित् त्यांची उपेक्षा करुनही प्राणांकडे अधिक लक्ष द्यावें. आवृतत्वामुळें विमार्गग झालेले दोष आपापल्या स्थानीं कसे येतील तें पहावें.
पितावृते तु पित्तघ्नैर्मारुतस्याविरोधिभि: ॥
कफावृते कफघ्नैस्तु मारुतस्यानुलोमनै: ॥१४५॥
च. चि. २८/२४५ पा. १४७८
वायु पित्तावृत झाला असतांना वायूला प्रतिकूल होणार नाहींत असे पित्तघ्न उपचार करावे व कफावृत झाला असता कफन्न व वातानुलोमन चिकित्सा करावी.
कल्प
दशमूले, ओंवा, खुरासनी ओंवा, सर्पगंधा, जटामांसी, एरण्ड, कुचला, रास्ना, हरमल, रौप्यभस्म, त्रिवंग, भस्म, सुवर्ण भस्म, अभ्रक भस्म, समीरपन्नग, मल्लसिंदूर, महायोगराज, गुग्गुळ, वातविध्वंस, बृहत्वातचिंतामणी, वातगजांकुश, दशमूलारिष्ट, अश्वगंधारिष्ट, रास्नादि काढा, नारायण तेल, विषगर्भ तैल, माष तेल, वला तेल,
पथ्यापथ्य
आहारामध्यें डाळी (द्विदल धान्यें) शीत आणि वात सेवन वर्ज्य करावें. स्निग्ध आणि उष्ण असे उपचार घ्यावेत. श्रम करु नयेत.