मज्जवहस्त्रोतस - मन्यास्तंभ
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
``दिवा स्वप्नासनस्थान विवृताध्वनिरीक्षणै: ॥
मन्यास्तम्भं प्रकुरुते स एव श्लेष्मणाऽऽवृत: ।
सु. नि. १-६७
मन्यास्तम्भं दर्शयन्नाह - दिवा स्वप्नेत्यादि ।
कैश्चिन्मन्यास्तम्भो न पठयते अन्तरायाम
बहिरायामलक्षणत्वान्मन्यास्तम्भस्य;
तन्न; स्वातन्त्र्येणाप्युपलम्भान्मन्या स्तम्भस्य ॥६७॥
न्या. च. टीका पान २६७
दिवसा झोपणें, उशी उंच घेणें, मान वर, खालती, तिरपी वाकडी करुन, ताणून पहाणें, या कारणांनीं वात प्रकुपित होऊन कफानें स्त्रोतसे अवरुद्ध झाल्यामुळें मन्यास्तंभ व्याधी उत्पन्न करतो. या व्याधींत मान ताठ होते. हलवितां येत नाहीं व हलविली असतां वेदना होतात. हा व्याधी अपतानक किंवा अंतरायाम यांच्या पूर्वरुपामध्यें असतो, असें डल्हणानें आतंकदर्पणकारानें व चक्रदत्तानें म्हटलें आहे. गयदासानें हा व्याधी केवळ अन्य लक्षण न मानतां स्वतंत्रही मानावा असें जें सांगितलें आहे तें योग्य आहे असे आम्हांस वाटतें.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP