मूत्रवहस्त्रोतस् - वातबस्ति
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वेगं विधारयेद्यस्तु मूत्रस्याकुशलो नर: ।
निरुणद्धि मुखं तस्य बस्तेर्बस्तिगतोऽनिल: ।
मूत्रसड्गो भवेत्तेन बस्तिकुक्षिनिपीडित: ।
वातबस्ति: स विज्ञेयो व्याधि: कृच्छ्रप्रसाधन: ।
सु. उ. ५८-९,१०
मूत्रं धारयतो बस्तौ वायु: क्रुद्धो विधारणात् ।
मूत्ररोधार्ति कण्डूभिर्वातबस्ति: स उच्यते ।
च. सिद्धि -९-३७ पान १७२५
वेगविधारण, रुक्ष, आहार-विहार, वार्धक्य वा आघातादि अपान दुष्टीचीं कारणें यामुळें प्रकुपित झालेला वायु बस्तीस दुष्ट करुन त्या ठिकाणीं साद व व्यास ही अवस्था उत्पन्न करतो. त्यामुळें मूत्रप्रवृत्ती न होता मूत्र सांचत जातें. कुक्षीमध्यें, या मूत्रसंचितीमुळें वेदना होतात. हा व्याधी कष्टसाध्य आहे. वाग्भटानें वातबस्ति या नांवानें उल्लेखलेला व्याधी त्यांतील लक्षणांचा विचार करतां माधवाच्या बस्तिकुंडल या व्याधीशी एकरुप आहे.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP