पुरीषवह स्त्रोतस - गुदगतवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
ग्रहोविण्मूत्रवातानां शूलाध्मानश्मशर्करा: ।
जड्गोरुत्रिकपात्पृष्ठरोगशोषौ (थौ) गुदस्थिते ।
च. चि. २८-२६ पान १४४८
गुदगत वातामध्यें वात-मूत्र-पुरीषांचा अवरोध, शूल, आध्मान, मुत्राश्मरी वा मुत्रशर्करा उत्पन्न होते, जंघा, उरु, त्रिक, पाय, पृष्ठ या अवयवांच्या ठिकाणीं शूल होतो. हे अवयव सुकतात वा (पाठभेदा प्रमाणें) या अवयवांच्यावर सूज येते.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP