मज्जवहस्त्रोतस - वेपथू - कंप
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
`सर्वाड्ग कम्प: शिरसो वायुर्वेपथुसंज्ञक: । वेपथु वात-
विकारमाह - सर्वेत्यादि । शिरस: कम्प इति संबन्ध:,
शिर इत्यवबोधलक्षणं, तेन हस्तादेरपि कम्पो वेपथुरित्यर्थ ॥ -
मा. नि. वातव्याधी म. टीकेसह पान २११
सर्व शरीर वा डोकें, हातपाय हे अवयव सारखे कांपतात, त्या व्याधीस कंप किंवा वेपथू असें म्हणतात. हातापायांमध्यें कंप असतांना, धरणें, उचलणें, चालणें, उभे रहाणें, या क्रिया नीट होत नाहींत. कांहीं वेळां हा कंप सतत नसतो तर मधून मधून कांही विशेष कारणांवाचूनही हात वा पाय कांपत रहातात. कांहीं वेळां विशिष्ट हालचाल करावयाचा विचार मनांत येतांच हातपाय कांपूं लागतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP