मज्जवहस्त्रोतस - खल्ली
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
ज्यावेळी हात आणि पाय या दोन्हीही अवयवांमध्ये विश्वाची वा गृध्रसी या सारख्या वेदना अधिक तीव्र स्वरूपात असतील त्या व्याधीस खल्ली म्हणावे.
खल्ली हा एक व्याधी मानून विश्वाची वा गृध्रसी असे त्याचे दोन प्रकार स्थान भेदाने होतात असे कांहीं ग्रंथकारांचे म्हणणें आहे. कांहींनीं खल्ली हा एक स्वतंत्र व्याधी मानावा असें म्हटलें आहे.
गृघसी व विश्वाचि हे व्याधी बहुधा एकाच हातांत वा एकाच पायांत आढळतात. क्वचित् गृघसी हा व्याधी दोन्ही पायांत एकदम झालेलाही आढळून येतो. वाताच्या वैषम्यामुळें एकदा एक पाय व नंतर दुसरा पाय अशा क्रमानेंही व्याधीचा संचार झालेला आढळतो.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP