स्कंध ११ वा - अध्याय २५ वा

N/Aसर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२९९॥ ।१-२।
देव म्हणे आतां उध्दवा, ऐक तें । असंमिश्र गुणें कवण जन्म ॥१॥
शम, दम, तेंवी तितिक्षा, विवेक । तप, दया, सत्य, स्मृति, तुष्टि ॥२॥
औदार्य तो त्याग अस्पृहा, सभ्यता । लज्जा, आस्तिकता आत्मप्रीति ॥३॥
श्रध्दा, ऐसें गुण जाणें सात्विकाचे । ऐकूनियां हर्षे वासुदेव ॥४॥

॥३००॥ ।३-५।
विषयेच्छ्दा, कर्म सकाम तें पाहीं । मद, दुराशाही अहंभाव ॥१॥
भक्ति ते सकाम, भेद, नित्य भोग । उल्हास आवड कीर्तीची ते ॥२॥
साहस तैं युध्द, प्रीति, दुर्विनोद । वीर्य सबलोद्यग राजसाचे ॥३॥
क्रोध, लोभ, हिंसा अनृत तैं यान्वा । दंभ, श्रम तैसा कलह, शोक ॥४॥
भ्रांति, दु:ख, दैन्य, निद्रा तैं आलस्य । भीति, नित्य हांव तामसाते ॥५॥
अनुक्रमे ऐसे सात्विकादि गुण । कथितो मिश्रण वासुदेव ॥६॥

॥३०१॥ ।६-१०।
अहंममभावें भूतेंद्रियें मन । करिती तें तें जाण संमिश्रचि ॥१॥
धर्म, अर्थ, काम निष्ठेनें जें कर्म । श्रध्दा, रति, धन, फलहि मिश्र ॥२॥
सात्विक राजस, क्रमें ते तामस । ऐसा गुणभेद श्रध्दादिकी ॥३॥
शमादि ते सत्व, कामादि राजस । क्रोधादि तामस मनुजवृत्ति ॥४॥
विहितकर्मे जी निष्कामोपासक । जाणा ती सात्विक, पुरुषस्त्री वा ॥५॥
वासुदेव म्हणे स्त्री-पुरुषभेद । नसेचि बा,  एथ सत्वादिकीं ॥६॥

॥३०२॥ ।११-१६।
इह-परेच्छेनें धर्म तो राजस । हिंसात्मक स्पष्ट तामस तो ॥१॥
सत्त्वादिक रज्जु बांधिती जीवासी । संबंध आत्म्यासी नसे त्यांचा ॥२॥
रज-तमांवरी विजय सत्वाचा । धर्म, ज्ञान, सुखा तदा वृध्दि ॥३॥
संग-भेद, बळें विजयी जैं रज । दु:ख, कर्म यश संपत्ति तैं ॥४॥
मोहाज्ञान जाडयें तमोवृध्दि होतां । शोक, मोह, निद्रा हिंसा, स्वप्न ॥५॥
चित्तप्रसन्नता इंद्रियेंही शांत । मन अनासक्त अभय देही ॥६॥
मत्पदप्रापक प्रगटतां सत्त्व । स्थिति हे नि:शंक ध्यानी घ्यावेम ॥७॥
वासुदेव म्हणे यापरी परीक्षा । करुनि, चित्ताचा ठाव घ्यावा ॥८॥

॥३०३॥ ।१७-२०।
चित्त जैं विक्षिप्त इंद्रियें अशान्त । मनही तें भ्रांत तदा रज ॥१॥
मूढचित्त ज्ञानग्रहण न करी । खिन्नताचि वरी मन तमें ॥२॥
सत्त्वें देवा, रजें असुरा, तमानें । बल राक्षसांतें देही, जनीं ॥३॥
जागृती सत्त्वानें, रजानें तें स्वप्न । गाढ निद्रा जाण तमोगुणे ॥४॥
तुरीयावस्था ते सर्वावस्थांमाजी । वासुदेव राजी तुरीयेंत ॥५॥

॥३०४॥ ।२१-२४।
ऊर्ध्वगति सत्त्वें, तमें अधोगति । रजें मध्यम ती भूलोकांत ॥१॥
सत्त्वें ते स्वर्गादि रजें नरलोक । पाषाणापर्यंत्त पतन तमें ॥२॥
निष्काम वा ईशार्पित तें सात्विक । सकाम राजस कर्म होई ॥३॥
हिंसायुक्त परपीडार्थ जें कर्म । तामस ते जाण वेदोक्तही ॥४॥
निरुपाधिक ते सात्विक, सोपाधि । राजस, तामसी असंस्कृत ॥५॥
ईशविषयक ज्ञान ते निर्गुण । वासुदेव ध्यान भगवंताचें ॥६॥

॥३०५॥ ।२५-२८।
वनी निवास सात्विक । ग्रामीं जाणावा राजस ॥
तामस ते द्यूतगृह । निर्गुण तो ममाश्रय ॥२॥
अनासक्त तो सात्विक । कर्ता आसक्त राजस ॥३॥
स्मृतिभ्रष्ट तामस जाण। मत्सेवक तो निर्गुण ॥४॥
अध्यात्मिकी ते सात्विक । श्रध्दा, कर्माची राजस ॥५॥
अधार्मिक ते तामसी । निर्गुण ते सेवा माझी ॥६॥
पथ्य, पूत सहजप्राप्त । जाणे आहार सात्विक ॥७॥
इंद्रियांचे पुरवी चोज । तोचि आहार राजस ॥८॥
अमंगल दु:खदाई । अहार तो तामस पाहीं ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसें । विविध प्रकाक्र गुणांचे ॥१०॥

॥३०६॥ ।२९-३१।
आत्मबोधोद्‍भूत सात्विक तें सौख्य । जाणावें राजस विषयोद्‍भूत ॥१॥
मोह दैन्योद्‍भूत तामस जाणावें । निर्गुण जाणावें भक्तिसौख्य ॥२॥
द्रव्य, देश, फल, काल, रुप, कर्म । स्थिति, कर्ता, ज्ञान, श्रध्दा, निष्ठा ॥३॥
ऐसी ही सर्वही जाणावी त्रिविध सर्वदृश्यभास्य त्रिगुणात्मक ।\४॥
उध्दवा, पुरुष-प्रकृतिआश्रित । जाणे ते समस्त गुणमयचि ॥५॥
दृष्ट, श्रुत, किंवा चिंतिति ते सर्व । जाणें वासुदेव त्रिविध गुणें ॥६॥

॥३०७॥ ।३२-३६।
गुणकर्मे घडे बंधक संसार । जिंकी हे समूळ मनोद्भव ॥१॥
विवेकी तो श्रेष्ठ ममभक्तियोगें । पावे मद्भावातें मन्निष्ठेनें ॥२॥
ज्ञान विज्ञानही दाता नरदेह । लाभतां यास्तव विवेकानें ॥३॥
निर्मिम निरहंभावें मद्भजन । करुनि रज-तम जिंकावे ते ॥४॥
निरपेक्ष शांत सत्वें सत्व जिंकी । होई निरुपाधि गुणतीत ॥५॥
जीवत्व-त्रैगुण्यनिर्मूक्त मद्रूप । क्रिया अंतर्बाह्य नसती तया ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा गुणातीत । होई ओतप्रोत ब्रह्मरुप ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP