मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ११ वा| अध्याय २४ वा स्कंध ११ वा एकादश स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ११ वा - अध्याय २४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ११ वा - अध्याय २४ वा Translation - भाषांतर ॥२९३॥ ।१-७।बोले भगवान पूर्वविनिर्णीत । कथितों मी सांख्यशास्त्र आतां ॥१॥जाणितां तें सर्व विकल्प-विनाश । साधाया सामर्थ्य प्राप्त होई ॥२॥युगारंभीं ज्ञान, ज्ञेय एक होतें । अद्वैतविवेकें नव्हते भेद ॥३॥मायाबळे द्विधा वाड्.मनोगोचर । प्रकृति-पुरुष ऐशा भेदें ॥४॥प्रकति-पुरुष उभयात्मिका ते । कार्य कारण ते, उभयविध ॥५॥जीवानुमतीनें प्रेरणेनें माझ्या । गुणोद्भव साचा प्रकृतींत ॥६॥वैषम्यें त्या सूत्र, महत्संयोगानें । मोहकारी जाणें अहंकार ॥७॥वैकारिक तेंवि तैजस, तामस । ऐसा तो त्रिविध जडाजड ॥८॥वासुदेव म्हणे तन्मात्रा इंद्रियें । मनालागी पाहें कारण तो ॥९॥॥२९४॥ ।८-११।तामस तन्मात्रांपासूनि तीं भूतें । ज्ञान कर्मेद्रियें राजसाची ॥१॥सत्वाशापासूनि देवाता सकळ । इंद्रियांसी बळ तयांचेंचि ॥२॥महत्तत्त्वादि मी प्रेरितां एकत्र । क्रियाशक्ति त्यांत मदिच्छेनें ॥३॥वास्तव्यार्थ माझ्या निर्मिती ती अंड । जलस्था तयांत प्रगटलों मी ॥४॥नाभींतून माझ्या विरंचि जन्मला । राजस बैसला तपासी तो ॥५॥अनुग्रहें माझ्या लोकपालंसवें । निर्मिलीं तयानें त्रिभुवनें ॥६॥वासुदेव म्हणे भू:भुव:स्व: । प्रकार ते पहा भुवनांचे त्या ॥७॥॥२९५॥ ।१२-१५।स्वर्गलोकीं देव, भूतें भूवलोकीं । वसती मानवादि भूलोकी या ॥१॥त्रिभुवनापरि सिध्दांची वसती । पाताळीं ते स्थिति असुर-नागां ॥२॥सत्त्व, रज, तमें, त्रिभुवनप्राप्ति । योगी, तपी, न्यासी महदादींत ॥३॥गुणमल ते न महर्लोकादीसी । अनन्य भक्तांसी वैकुंठ तो ॥४॥कालस्वरुपी जो मीचि सर्वकर्ता । कर्मगतिदाता जीवांप्रति ॥५॥सत्वादि प्रवाही गटंगळया खाती । जीव, तेंचि कथी वासुदेव ॥६॥॥२९६॥ ।१६-१९।प्रकृति-पुरुषअंशें सान-थोर । सकल पदार्थ प्रकटती हे ॥१॥आदि, मध्य, अंत जयांत तें सत्य । विकारें व्यवहार घडती सर्व ॥२॥सुवर्ण मृत्तिकाविकारें व्यवहार । आदि अंती सर्व सुवर्णाचि ॥३॥मृत्तिकोपादान पिंडतो निमित्त । कारण घटास महदादि तैं ॥४॥व्यावहारिकत्व तया सत्यालागीं । प्रकृति तयासी उपदान ॥५॥परमपुरुषचि आधार तयाचा । पकाशक त्याचा काल असे ॥६॥प्रकृति-पुरुष, कालत्रय हें मी । ब्रह्मरुप, मानी वासुदेव ॥७॥॥२९७॥ ।२०-२४।ईक्षण ईशाचे तावत्काल सृष्टि । जीवभोगार्थ ही अव्याहत ॥१॥परंपरेनेंचि चाले, आदि-अंत । स्थितिही त्या मीच प्रलयीं नाश ॥२॥शरीर अन्नांत, अन्नधान्य बीजीं । बीज पृथ्वीमाजी तेंही गंधीं ॥३॥ऐसी उपादानकारणीं विलीन । स्वरुप त्यागून होती भूतें ॥४॥गंध जळीं, जळ, रसांत, यापरी । कारणांत सारी सृष्टि लीन ॥५॥वासुदेव म्हणे त्या त्या गुणीं ते ते । विकार लयातेम पावताति ॥६॥॥२९८॥ ।२५-२९।इंद्रियदेवता लीन मनामाजी । शब्द तन्मात्रा ती अहंमाजी ॥१॥अहंकार महत्तत्त्वामाजी लीन । गुणांत तें, गुण अव्यक्तांत ॥२॥अव्यक्त अखंड कालामाजी लीन । ईश्वरीं विलीन होई काल ॥३॥ईश्वरही अज आत्म्यांत विलीन । स्वस्वरुपमग्न निर्गुण तो ॥४॥चिंतनें या भ्रांति न होई कदापि । होतां नष्ट जेंवी सूर्ये तम ॥५॥संशयोच्छेदक सांख्यशास्त्र ऐसें । विलोमानुलोमें कथिलें तुज ॥६॥भूत, भविष्य मी जाणतों उध्दवा । मोद वासुदेवा बोधगानें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 17, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP