मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय २० वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय २० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय २० वा Translation - भाषांतर १४८परीक्षिते, आतां पुरूवंश ऐकें । धन्य तूं त्या वंशें जाहलासी ॥१॥वंशीं या राजर्षि ब्रह्मर्षीही झाले । श्रेष्ठता पावले ज्ञानें जगीं ॥२॥पूरुपुत्र जनमेजया प्रचिन्वान् । प्रवीर त्या जाण नमस्यु त्या ॥३॥चारुपद, सुद्यु, बहुगव, संयाति । रौद्राश्व तो अहंयातीलागीं ॥४॥ऋतेयुआदिक रौद्राश्वरासी दश । पुत्र रंतिभार ऋतेयूचा ॥५॥अप्रतिरथ त्या पुत्र जो धाकुटा । कण्व पुत्र त्याचा सुविख्यात ॥६॥मेधातिथि त्याचा, प्रस्कण्वादि विप्र । पुत्र तया देख बहुत होती ॥७॥वासुदेव म्हणे ऋतेयूचा वंश । क्षात्रधर्मरत परिसा आतां ॥८॥१४९ऋतेयूचा ज्येष्ठ पुत्र जो सुमति । रैभ्य तयाप्रति पुत्र एक ॥१॥दुष्यंत तयाचा सुविख्यात पुत्र । तयाचें चरित्र कथितों ऐकें ॥२॥मृगयेसी राव हिंडतां एकदां । आश्रमीं कण्वांच्या प्राप्त झाला ॥३॥तयास्थानीं एक लावण्यलतिका । पाहूनियां चित्ता मोह त्याच्या ॥४॥मोहित होऊनि वदला तियेसी । कोणा क्षत्रियाची सांगें कन्या ॥५॥अपात्रीं कदापि पुरुवंशजाचें । मोह न पावतें चित्त ऐसें ॥६॥वासुदेव म्हणे खाण लावण्याची । सत्यचि ते होती शकुंतला ॥७॥१५०विश्वामित्राची मी कन्या ते वदली । माता मम गेली त्यजूनि मज ॥१॥मेनका तियेचें नाम महाभागा । दिन एक व्हावा वास एथ ॥२॥ऐकूनि दुष्यंत बोलला तियेसी । कुशिक कुळासी वदसी योग्य ॥३॥राजकन्या जगीं अनुरुप पति । स्वयेंचि शोधिती धर्मज्ञा त्या ॥४॥संवाद यापरी होऊनि तयांचा । विवाहही साचा होई वनीं ॥५॥वासुदेव म्हणे गांधर्वपद्धति । रीत क्षत्रियांची पुरातन ॥६॥१५१अमोघवीर्यत्वें राजर्षीपासूनि । गर्भ त्याचि दिनीं राहियेला ॥१॥अन्य दिनीं राव गेला स्वनगरीं । आश्रमीं राहिली शकुंतला ॥२॥योग्यकालीं पुत्र जाहला तियेसी । कण्व जातकादि करिती त्याचें ॥३॥लोकपालअंशे पुत्र तो विक्रमी । आयाळ धरुनि आणी सिंहा ॥४॥नृपाच्या सदनीं जातां शकुंतला । मान्यता तियेचा न देई तो ॥५॥कारण विवाह नव्हता प्रकट । लोकापवादास भ्याला राव ॥६॥वासुदेव म्हणे नभोवाणी तदा । होई काय ऐका सभेमाजी ॥७॥१५२जन्मदाता तूंचि नृपा, या बाळाचा । पित्यासम पुत्रा गुण गोत्र ॥१॥चर्मकोश मात्र माता ते केवळ । पित्याचेंचि कुळ पुत्रा लाभे ॥२॥स्वीकार यास्तव करीं या पुत्राचा । अपमान कांतेचा करुं नको ॥३॥ऐकूनि ते वाणी पुत्रासवें कांता । स्वीकारुनि राजा सौख्य भोगी ॥४॥वासुदेव म्हणे पित्यामागें पुत्र । जाहला विख्यात जगामाजी ॥५॥१५३चक्रवर्ति तो नृपाळ । चक्रचिन्ह हस्तावर ॥१॥चरणीं चिन्ह कमलाचें । सामंतेय गुरु त्याचे ॥२॥गंगा-यमुनांचे तीरीं । भरत बहु यज्ञ करी ॥३॥धेनु गजही वांटिले । विप्रां संतोषित केलें ॥४॥बाहु उभारितां हात । पोंचती न जैं नभास ॥५॥तेंवी योग्यता भरताची । जगीं न येई कोणासी ॥६॥सप्त-विंशतिसहस्त्र । वर्षे भरताचें राज्य ॥७॥वासुदेव म्हणे राजा । पुढती पावला वैराग्या ॥८॥१५४विदर्भ कुळींच्या राण्या तया तीन । वैराग्यसंपन्न राजा तयां- ॥१॥वदला, अपेक्षा न मन तुमची । पुत्र वा नव्हेचि धन माझें ॥२॥यास्तव त्यागूनि सर्व हें वनांत । जाईन मी अद्य अत्यानंदें ॥३॥विपर्यास त्याच्या होई वचनाचा । नाश स्वपुत्रांचा करिती राण्या ॥४॥व्यभिचारिणी हा मानितो आम्हांसी । ऐसें मनामाजी येई त्यांच्या ॥५॥यास्तव आपुले नव्हेत तयांसी । वधूनि नृपासी तोष द्यावा ॥६॥वासुदेव म्हणे हेतु जरी शुद्ध । जाहला निर्वंश परी त्यांचा ॥७॥१५५मरुत्सोम यज्ञ पुत्रास्तव तदा । करणें भरता प्राप्त झालें ॥१॥मरुत्देवांनीं त्या अर्पियेला पुत्र । नाम भरद्वाज जयाप्रति ॥२॥वृत्त त्याचें आतां विस्मयकारक । निवेदिती शुक परीक्षिता ॥३॥एकदां ‘उतथ्य’ बंधूच्या भार्येसी । संग बृहस्पति करुं इच्छी ॥४॥‘ममता’ तैं होती गर्भिणी, तियेचा - । गर्भ प्रतिबंधा करी तया ॥५॥क्रोधें बृहस्पति वदला तैं गर्भा । अंध होईं माझा शाप ऐसा ॥६॥वासुदेव म्हणे बृहस्पतिवीर्य । पावलें पुत्रत्व तयावेळीं ॥७॥१५६परी त्या पुत्रासी रक्षी न ममता । संरक्षीं या पुत्रा म्हणे गुरु ॥१॥तीही त्या तैसेंचि वदली यास्तव । नाम ‘भरद्वाज’ तया पुत्रा ॥२॥अंतीं त्यागूनियां गेलीं तया दोघें । मरुत तयातें नेती गृहीं ॥३॥वासुदेव म्हणे पुढती मरुत । पुत्र भरतास अर्पिती तो ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP