मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ९ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय ९ वा Translation - भाषांतर ६६निवेदिती शुक राया, अंशुमान । गंगेस्तव जाण यत्न करी ॥१॥तपश्चर्या केली तयानें बहुत । कार्य परी सिद्ध झालें नाहीं ॥२॥अंतीं स्वीकारुनि मरण तो गेला । दिलीप रतला त्याचि काजीं ॥३॥असिद्धहेतु तो पावला मरण । गांठी बदरीवन, पुत्र त्याचा - ॥४॥भगीरथ, तोही करी घोर तप । आराधी गंगेस धरुनि निष्ठा ॥५॥वासुदेव म्हणे होऊनि प्रसन्न । वर घे मागून वदली गंगा ॥६॥६७पितृउद्धारार्थ भूमीवरी येईं । गंगेसी विनवी राव ऐसें ॥१॥ऐकूनियां गंगा म्हणे माझा वेग । साहील जगांत कोण ऐसा ॥२॥रसातळीं तेणें जाईल प्रवाह । होईल अपाय अन्यचि तो ॥३॥सकलही जन मजमाजी पाप । क्षाळितील मज शुद्धि केंवी ॥४॥भगीरथ म्हणे दर्शनें केवळ । हरिती सकळ पाप जनीं ॥५॥ऐसे हरिप्रिय स्पर्शितां तुजसी । काय पातकांची क्षति तेथे ॥६॥वासुदेव म्हणे सज्जनदर्शन । पातकविहीन करी नरा ॥७॥६८गंगेप्रति भगीरथ । म्हणे रुद्र दयावंत ॥१॥त्याचें सामर्थ्य अगाध । साहील तो तव वेग ॥२॥पटामाजी तंतूसम । अवघें भरला तो जाण ॥३॥बोलूनियां ऐशापरी । शिवआराधना करी ॥४॥होतां प्रसन्न शंकर । कथी हेतु तया सर्व ॥५॥शिरीं प्रवाह तैं घेई । वासुदेव वंदी पाईं ॥६॥६९वायुगति रथामाजी तदा राव । घेऊनियां धांव पुढती जाई ॥१॥पूर्वजांचें भस्म होतें जया ठाई । तया स्थानीं येईं म्हणे गंगे ॥२॥तदा गंगा देश पुनीत करीत । जाई त्या स्थानास महावेगें ॥३॥स्पर्शमात्रें तिच्या स्वर्ग, पितरांसी । भगीरथाप्रति हर्ष बहु ॥४॥केवळ स्पर्शाचा महिमा यापरी । स्नानें न उद्धरी कां न गंगा ॥५॥वासुदेव म्हणे भगीरथयत्नें । ‘भागीरथी’ नामें ख्यात गंगा ॥६॥७०श्रुत, नाभ दोन पुत्र भगीरथा । सिंधुद्वीप नाभा पुत्र एक ॥१॥अयुतायु त्याचा पुढती ऋतुपर्ण । जाहला जो धन्य नळाश्रयें ॥२॥सर्वकाम तया सुदास पुढती । मित्रसह त्यासी पुत्र झाला ॥३॥कल्माषपाद या नामें तो प्रसिद्ध । मदयंती त्यास कांता शोभे ॥४॥वासुदेव म्हणे कल्माषपादाचें । वृत्त नृपाळातें कथिति मुनि ॥५॥७१मृगयेसी जातां एकदां उन्मत्त । मारिला राक्षस नृपाळानें ॥१॥पलायनें बंधु वांचला तयाचा । सूडभाव त्याच्या अंतरांत ॥२॥कल्पाषपादाचा पाचक जाहला । थोर घात केला समयीं तेणें ॥३॥एकदां वसिष्ठ येतां भोजनासी । नरमांस त्यासी वाढियेळें ॥४॥पाहूनि तें क्रुद्ध होऊनि वसिष्ठ । शापिती नृपास ‘राक्षस हो’ ॥५॥वासुदेव म्हणे मित्रसह तदा । शापाया वसिष्ठा सिद्ध होई ॥६॥७२अनपराधित्वें क्रुद्ध होई राव । मदयंती त्यास निवारी तैं ॥१॥अभिमंत्रित हें जल टाकूं कोठें । प्रश्न हा रायातें पीडा देई ॥२॥कोठेंही टाकितां पीडील जीवांसी । चिंतूनियां अंतीं चरणीं घेई ॥३॥तेणें कृष्णवर्ण चरण तयाचे । वृत्त वसिष्ठातें कळलें यदा ॥४॥तदा द्वादशाब्द मर्यादा शापासी । घालूनियां जाती निजाश्रमीं ॥५॥वासुदेव म्हणे विप्रशापें राव । जाहला राक्षस हाय दैव ॥६॥७३संचार करीत राही राक्षस वनांत ॥विप्रदंपती तयानें पाहियेली एक ॥१॥क्षुधाकुल राव तदा धरी त्या विप्रासी ॥विप्रयुवती तैं आर्त होऊनि त्या प्रार्थी ॥२॥म्हणे हो सदय राजा, नव्हसी राक्षस ॥मदयंतीपति धन्य इक्ष्वाकुवंशज ॥३॥अपत्यार्थ द्यावा प्रति, रति हे अपूर्ण ॥राया, विप्र हा जाणावा तप-विद्यापूर्ण ॥४॥धार्मिका, हे घोरबुद्धि जाहली कोठूनि ॥प्रथम भक्षावें मज ऐकें विनवणी ॥५॥वासुदेव म्हणे राव प्रार्थना ऐकेना ॥पाहूनि तैं क्रोधाकुल बोलली वचना ॥६॥७४कामव्यथित मी असतां पतीतें । वधिसी शाप घे तेणें माझा ॥१॥मैथुनप्रवृत्त होतां मरशील । खचित अटळ दैव जनीं ॥२॥पुढती पतीच्या घेऊनियां अस्थि । ब्राह्मणी ते सती जाई सुखें ॥३॥द्वादशाब्द ऐसा काळ तो लोटतां । शापमुक्त राजा सदनीं येई ॥४॥मदयंतीचा तो करितां स्वीकार । करी प्रतिबंध राणी तया ॥५॥कारण सकळ कथितां राणीनें । त्यागिलें नृपानें रतिसौख्य ॥६॥वासुदेव म्हणे एकामागें एक । विपत्ती अनेक दैवक्षोभें ॥७॥७५नृपानुमोदनें वसिष्ठांपासूनि । गर्भवती राणी मदयंती ॥१॥जन्मेनाचि परा सप्त वर्षे गर्भ । अश्मप्रहारें तो जन्म पावे ॥२॥‘अश्मक’ चि नाम पावला त्या योगें । मूलक तयातें पुत्र होई ॥३॥भार्गवभयें तो लपला स्त्रियांत । क्षत्रिय वंशास पुढती मूळ ॥४॥दशरथ, ऐडविड, विश्वसह । यथाक्रम वंश पुढती त्याचा ॥५॥वासुदेव म्हणे खट्वांग पुढती । विश्वसहाप्रति पुत्र होई ॥६॥७६देव-दानवाच्या युद्धांत खट्वांग । जाहला देवांस राज्यदाता ॥१॥तदा ते तयासी वरदाना सिद्ध । होतां म्हणे मज प्रथम सांगा ॥२॥आयुष्य राहिलें अवशिष्ट किती । घटिका द्वयचि म्हणती देव ॥३॥तदा मृत्युलोकीं येऊनि विवेकें । जोडिला खट्वांगें ब्रह्मभाव ॥४॥विप्रकुळ माझें दैवत तो म्हणे । देवही मायेनें भ्रमती केंवी ॥५॥मायाचालका त्या भजेन मी नित्य । चिंतूनियां मुक्त होई नृप ॥६॥वासुदेव म्हणे स्वस्वरुपस्थिति । लाभे तयां मुक्ति, भक्तां ईश ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP