स्कंध ९ वा - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२३
पुरुपुत्र आयुलागीं सुत पांच । नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, रंभ ॥१॥
अनेना पांचवा क्षत्रवृद्धवंश । कथितों तो ऐक परीक्षिता ॥२॥
सुहोत्र नामक पुत्र क्षत्रवृद्धा । पुत्र तीन तया काश्य, कुश ॥३॥
गृत्समद, ऐसीं नामें तयांप्रति । गृत्समदाप्रति शुनक: पुत्र ॥४॥
शौनक तयाचा ऋग्वेद्यांत श्रेष्ठ । सुहोत्राचा पुत्र काश्य नामें ॥५॥
काशि तया पुत्र राष्ट्र, दीर्घतमा । पुढती ते जाणा यथाक्रम ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती धन्वंतरि । स्मरणेंचि हरी सकल रोग ॥७॥

१२४
केतुमान्‍, भीमरथ, दिवोदास । द्युमान्‍ तयास पुत्र होई ॥१॥
अलर्क तयाच्या पुत्रांमाजी श्रेष्ठ । सहासष्ट सहस्त्र अब्दें राजा ॥२॥
संतति, सुनीथ, सुकेतन तेंवी । धर्मकेतु पाहीं सत्यकेतु ॥३॥
धृष्टकेतु, सुकुमार, वीतिहोत्र । भर्ग तया पुत्र भार्गभूमि ॥४॥
वासुदेव म्हणे रंभादिकवंश । निवेदिती शुक ऐका आतां ॥५॥

१२५
रभस, गंभीर पुत्र ते रंभातें । अक्रिय रभसातें पुत्र एक ॥१॥
विप्रकुल त्याच्या होई स्त्रीपासूनि । अनेनासी गुणी पुत्र ‘शुद्ध’ ॥२॥
शुचि, त्रिककुत्‍, शांतरय त्याचा । निरिच्छ तो होता आत्मज्ञानी ॥३॥
रजीप्रति होते पंच शतपुत्र । रजीसी त्या स्वर्ग दिधला इंद्रें ॥४॥
दैत्यभयें, मागे पुढती पुत्रांसी । देती न ते त्यासी, गुरु तदा - ॥५॥
अभिचारयज्ञें भ्रष्टमती करी । इंद्र तैं संहारी तयांलागीं ॥६॥
वासुदेव म्हणे विरुद्ध उपाय । यशस्वी ते काल फिरतां होती ॥७॥

१२६
क्षत्रवृद्धपौत्र कुशपुत्र ‘प्रति’ । संजय तयासी पुढती जय ॥१॥
‘कृत’ ‘हर्यवन’ ‘सहदेव’ ‘हीन’ पुढती जयसेन, संकृति ते ॥२॥
संकृतीसी जय नामें पुत्र एक । क्षत्रियवरिष्ठ जाण होता ॥३॥
क्षत्रवृद्धादींचा विस्तार कथिला । ऐकावा वहिला नहुषवंश ॥४॥
वासुदेव म्हणे वंश हे प्रसिद्ध । ऐकूनि निरत व्हावें धर्मी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP