मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ५ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत Tस्कंध ९ वा - अध्याय ५ वा Translation - भाषांतर ३७ईश्वरवचनें अंबरीषाप्रति । येऊनियां प्रार्थी विनयें मुनि ॥१॥आपणाकारणें त्रेधा ते विप्राची । पाहूनि नृपासी लाज वाटे ॥२॥असहाय स्थिति पाहूनि मुनींची । अंबरीष प्रार्थी सुदर्शना ॥३॥सुदर्शना, घेईं नमस्कार माझा । सर्व सामर्थ्याचा ठेवा तूंचि ॥४॥दुष्टविनाशार्थ ठाकसी तूं रणीं । शांतिदाता जनीं तूंचि एक ॥५॥दानधर्म ईशभाव जरी मज । संरक्षीं विप्रास तरी चक्रा ॥६॥वासुदेव म्हणे चक्र तदा शांत । पाहुनि दुर्वास तोष पावे ॥७॥३८मुनि म्हणे राया, भक्तहृदयाचा । अनुभव साचा आजि मज ॥१॥जोडिला जयांनीं जगन्नाथ त्यांसी । असाध्य कांहींचि नसे लोकीं ॥२॥त्रिविध ताप त्यां करितील काय । सर्वदा निर्भय भक्तजन ॥३॥उदारा, यद्यपि केला अपराध । तथापि तूं मज संरक्षिलें ॥४॥अपकार्यातेंही उपकारकर्ते । धन्य जगीं ऐसे संतश्रेष्ठ ॥५॥वासुदेव म्हणे सर्वांभूतीं सम । तेंवी क्षमावान तेचि संत ॥६॥३९शुकमहामुनि बोलले गृहासी । नव्हतें कांहींचि ज्ञात नृपा ॥१॥प्रतिक्षा मुनींची पहात बैसला । अब्द एक गेला काल ऐसा ॥२॥अतिथि भोजनावीण तया अन्न । नव्हतेंचि जाण वर्ष एक ॥३॥मुनींचा हा ताप पाहूनि त्या दु:ख । भोजन षड्रस देई तयां ॥४॥अनुज्ञेनें करी पुढती भोजन । करीत वर्णन मुनि गेले ॥५॥श्रवण - पठनें याच्या ईश तोष । पुत्र नृपाळातें होती तीन ॥६॥अर्पूनि त्यां राज्य पावला तो मुक्ति । वासुदेव वंदी नृपाळा त्या ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP